आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवार्ता: मंगळवेढ्यात १५ वर्षांच्या अमीरचा अपहरणानंतर खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा - मंगळवेढ्यातून शनिवारी गायब झालेल्या अमीरअहमद दिलीप मुलाणी (रा. नंदूर, ता. मंगळवेढा, वय १५) याची हत्या करण्यात आल्याचे बुधवारी उघड झाले. मंगळवेढा-मरवडे रोडवर कॅनॉलजवळ त्याचा मृतदेह सापडला. त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी मंगळवेढा येथील एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. मात्र, तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अभिषेक डहाके यांनी ताब्यातील संशयिताचे नाव सांगितले नाही.

नंदूर (ता. मंगळवेढा) येथील अमीरअहमद दिलीप मुलाणी (वय १५) हा न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे नववी वर्गात शिकत होता. शनिवार दि. जानेवारी २०१६ रोजी जवाहर नवोदय विद्यालयातील (पोखरापूर) विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने शाळेस सुटी देण्यात आलेली होती. यासाठी शाळेने रविवारी १० जानेवारी २०१६ रोजी शाळा चालू ठेवली होती. अमीर हा नेहमीप्रमाणे शाळेला गेला. दुपारी साडेचार वाजता शाळा सुटल्यानंतर चोखामेळा चौक येथे जाऊन येतो, असे मित्रांना म्हणाला. अशी माहिती त्याच्या मित्रांनी वडिलांना सांगितली. परंतु रात्री उशिरापर्यंत तो घरी आल्याने वडील दिलीप मौला मुलाणी (वय ४५) यांनी सोमवार ११ जानेवारी २०१६ रोजी मंगळवेढा पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. बुधवारी मजनू गैबी मुलाणी या रिक्षाचालकाला मंगळवेढा-मरवडे रोडवर एका मुलाचा मृतदेह दिसला. त्याने पोलिसांना कळवले.

नंदूर येथील अशी दुसरी घटना
पोलिसांनीपाहणी केल्यानंतर धारधार शस्त्राने गळा चिरून अमीरची हत्या केल्याचे उघड झाले. नंदूर येथे यापूर्वी असाच एक खून झाला होता. आजतागायत त्याचा तपास लागला नाही. त्यामुळे गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांच्या दृष्टीने तपासाचे मोठे आव्हान आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तपासाचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन कौसडगीकर, पोलिस उपअधीक्षक विशाल नेहूल यांनी पाहणी केली.