आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिन्यांनंतर पावसाने ओलांडली शंभरी, सोलापूरध्‍ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर; पावसाळ्याचेतीन महिने कोरडे गेल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. प्रशासन दुष्काळी उपाययोजना करण्याचे नियोजन करत असताना परतीच्या पावसाने दिलासा दिला. गेले दोन दिवसांत २० मिलिमीटर इतका पाऊस झाला. सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ११४ मि. मी. इतका पाऊस झाला, असे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात मागील वर्षी सप्टेंबरअखेर ३३० मि. मी. पावसाची नोंद झाली होती. यंदा सरासरीच्या केवळ २३ टक्के इतका पाऊस झाला आहे. मंगळवारी १.४ मि.मी. पावसाची नोंद झाली.
गेले तीन महिन्यांत जिल्ह्यात एकूण ८५ मि. मी. इतका पाऊस झाल्याची नोंद होती. यामध्ये बार्शी अक्कलकोट तालुका वगळता इतर तालुके १०० मि. मी.च्या आतच होते. मागील दोन दिवसांत झालेल्या पावसाने माळशिरस तालुका वगळता इतर तालुक्यांत पावसाने १०० मि. मी.ची सरासरी ओलांडली आहे. मागील वर्षांचा इतिहास पाहता परतीचा पाऊस १९० मि. मी. इतका पडतो. जिल्ह्याची सरासरी ४८८ मि. मी. इतकी असली तरी यंदा २५० मि. मी. इतका पाऊस पडेल, असा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

माळशिरसमध्येसर्वात कमी पाऊस
११पैकी फक्त तालुक्यांत १०० मि. मी. पेक्षा कमी पाऊस असून उर्वरित सर्वच तालुक्यात सरासरी १०० मि. मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. माळशिरस तालुक्यात सर्वात कमी ६१ मि. मी. तर त्याखालोखाल माेहोळ तालुक्यात ९८ मि. मी. इतका पाऊस झाला आहे.

तालुकानिहायपाऊस मि. मी.मध्ये
चालूमोसमातील पाऊस : उत्तर सोेलापूर १३१.६६, दक्षिण सोलापूर ११५, बार्शी १५१.६१, अक्कलकोट १४४.८६, मोहोळ ९८.६४, माढा ११८, करमाळा १०८.४८, पंढरपूर ११९.४४, सांगोला १०२.२४, माळशिरस ६१.४०, मंगळवेढा ११२.२७, एकूण ११४.७९
मंगळवारी भवानी पेठ येथे पावसाचे टिपलेले छायािचत्र.