आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर नवव्या दिवशी झाली गळतीची दुरुस्ती: लाखो लिटर पाणी वाया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- हैदराबाद रस्त्यावरील विडी घरकुलच्या पोगूल विहिरीलगत पाइप फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. गेल्या आठ दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणले. त्याची दखल घेऊन महापालिकेच्या यंत्रणेने मंगळवारी दुपारी त्याची दुरुस्ती केली. परंतु वाया गेलेल्या पाण्याचा हिशेब मात्र तसाच राहिला. विभागीय अधिकारी, नगरसेवक आणि नागरिकांनी सांगूनही यंत्रणेने वेळीच उपाय केले नाहीत. त्यामुळे सुमारे एमएलडी पाणी वाया गेल्याचा अंदाज आहे. त्याची भरपाई देणार कोण? हा त्यातून उपस्थित झालेला प्रश्न आहे.

जवाहरनगर पाण्याच्या टाकीपासून गेलेली १० इंची मुख्य जलवाहिनी फुटली. त्याची दुरुस्ती विभागीय कार्यालयाकडे येत नाही. विभागीय कार्यालय क्रमांक दोनचे अधिकारी अतुल भालेराव यांनी मुख्य कार्यालयाकडे याबाबत कळवले. परंतु तेथील यंत्रणेला हलायला तब्बल नऊ दिवस लागले. या नऊ दिवसांत वाया गेलेल्या पाण्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आहे.

अधिकाऱ्यांच्या खिशातून वसूल करा
वेळीचकळवूनही दखल घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडूनच पाण्याचा हिशेब घेतला पाहिजे. कारण नागरिक नियमित पाणी भरूनही त्यांना वेळेत पाणी देण्याचे नियोजन होत नाही. दुसरीकडे पाणी वाया गेल्याचे सांगूनही दखल नसल्यास केवळ अनागांेदीच म्हणावी लागेल. विठ्ठलकोटा, नगरसेवक
विडी घरकुलच्या पोगूल विहिरीजवळ पाइपलाइन फुटली. त्यामुळे गेल्या दिवसांपासून पाणी वाया जात आहे.
बातम्या आणखी आहेत...