आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या विडी कामगार महिलांची राजधानी दिल्लीत धडक, पर्यायी रोजगाराची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बंद करण्यात अालेले विडी कारखाने चालू करा, अन्यथा पर्यायी रोजगार द्या, अशी मागणी करत सोलापुरातील विडी कामगार महिलांनी सोमवारी सकाळी केंद्र सरकारच्या विरोधात दिल्लीत केंद्रीय अारोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली.
विडी उद्योगाचा धूम्रपान कायद्यात समावेश केल्याने एप्रिलपासून विडी कारखाने बंद अाहेत. त्यामुळे सोलापुरातील जवळपास ७० ते ८० हजार राज्यात पाच लाखांपेक्षा जास्त विडी कामगार महिलांची उपासमार सुरू झाली अाहे. काहीजणांनी अात्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. हा उद्योग टिकावा किंवा त्या महिलांना पर्यायी रोजगार द्यावा या मागणीसाठी शहर मध्यच्या अामदार प्रणिती शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपासून अांदोलन सुरू केले अाहे. फूड पॅकेट पुरवण्याची योजना राबवली. पिवळ्या कार्डधारकांप्रमाणे या महिलांनाही धान्य मिळावे म्हणून प्रयत्न केले. अनेक अांदोलने केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेतही बैठका झाल्या. पण विडी उद्योग सुरू झाला नाही.

त्यामुळे अखेर धूम्रपान कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या केंद्र सरकारकडे हा विषय मांडण्यासाठी प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विडी कामगार महिलांनी दिल्लीत धडक मारली. या वेळी कस्तुरीबाई मेरगू, भारतीबाई एक्कलदेवी, झुलेखा विजापुरे, फरझाना शेख, छाया पोला, गीताबाई कय्यावाले, अनिता दोरनाल, कलावती साखरे, गीता शिवशिंगवाले, रेखा येमूल, जुगनबाई मनसावाले, मीणा गडगी, गीरा फटफटवाले, लक्ष्मीबाई कय्यावाले, शकुंतला नल्ला, अन्नपूर्णा गुंडेली, निर्मला चन्ना, कलावती श्रीराम अादी महिलांचा सहभाग होता.

यापुढे जंतर मंतरवर आंदोलन
केंद्रीयअारोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन त्यांना सोलापूरच्या समस्येबाबत माहिती दिली. त्याचे एक निवेदनही सादर केले. अटी शिथिल कराव्यात, अात्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत मिळावी, पेन्शन योजना लागू करावी, महिला कामगारांना पर्यायी रोजगार द्यावा, या मागण्यांचा समावेश अाहे. विडी कामगारांच्या पुनर्वसनासाठी अधिवेशनात निर्णय घेतला नाही तर जंतर-मंतरवर आंदोलनाचा इशारा देण्यात आला