आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर घसरल्याने मोफत भाजीपाला वाटप करत केले निषेध आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सध्या बाजारात भाजीपाल्यांच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे, याकडे शासन लक्ष देत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळी संजय पाटील घाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमाेरच भाजीपाला विक्री करीत शासनाचा निषेध नोंदविला.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये आज बाजारामध्ये शेतमालाचे विशेषत: भाजीपाल्यांच्या दरात घसरण झाली आहे. कांदा, टोमॅटो, दोडका, मिरची शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागत आहे. शासनाने कांद्याला प्रति क्विंटल १०० रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. किमान २५०० रुपये हमीभावाने खरेदी करावी. पणन विभागाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने शेतकऱ्यांना परवडतील अशा दरामध्ये धाेरण आखावे, अशी मागणी निवेदनामध्ये केली. आंदोलनात माऊली हळणवर, भीमाशंकर बिराजदार, रमेश भोसले, किसन घोडके, ज्ञानेश्वर भोसले, अमोल शिंदे, संतोष पवार, पंडित बागल, विकास पाटील, मधुकर पवार, सोमनाथ भोसले आदी शेतकऱ्यांचा सहभाग होता.

शासनविरोधात केली घोषणाबाजी...
बळीराजाशेतकरी संघटनेकडे मिरची, दोडके, कारले, कांदे, टोमॅटोचे जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले. यावेळी मोफत भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. एक तासभर सुरू असलेल्या निषेध आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी शासनविरोधात घोषणाबाजी केली.
शेतमालास दर देण्याप्रकरणी बळीराजा संघटनेच्या वतीने संजय पाटील घाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी गांधीगिरी करीत मोफत भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...