आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमती कट्ट्यावर बसवणार इलेक्ट्रॉनिक समया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ग्राम दैवतश्री सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा होत असलेल्या संमती कट्ट्यावर आता कायमस्वरूपी इलेक्ट्रॉनिक समया लावण्यात येत आहेत. या समया विजेवरच्या एलईडी प्रकारातील असून कट्ट्याच्या दोन्ही बाजूंना दोन अशा त्या बसवण्यात येत आहेत.

यापूर्वी मंदिर परिसर, तलाव आणि वॉक वे आदींवर विद्युतीकरण करून विविधरंगी प्रकाशतझोत टाकून मंदिर उजवळण्याचे काम करण्यात आले. आता संमती कट्ट्याच्या दोन्ही कोपऱ्यावर उभ्या लोखंडी चिमण्यांवर या समया उभ्या करण्यात येत आहेत. सिद्धेश्वर पेठेतील चव्हाण फॅब्रिकेटर्सकडून या समया करण्यात येत असून निधी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या सहकार्यातून उपलब्ध झाले.

अशी असेल रचना
संमती कट्ट्याच्या दोन्ही कोपऱ्यांवर ठराविक चार ते पाच फूट उंचीवर हे कंदीलवजा समई दिवे खांबावर असतील. एकाच खांबावर समयांप्रमाणे पाच दिवे एकत्र असतील. साधारण एक फुटाच्या काचेच्या हंडीच्या स्वरूपात असे एकूण पाच दिवे एकत्र उभे करण्यात येतील. या दिव्यांचे बाह्यरूप ब्रिटिशकालीन दिव्यांप्रमाणेच असणार आहे.