आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agricultural Development Project In Directly Sell To Orange

कृषी विकास प्रकल्पांतर्गत थेट संत्रा विक्री उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालास चांगला दर मिळावा ग्राहकांना दर्जेदार माल उपलब्ध व्हावा, यासाठी समन्वयित कृषी विकास प्रकल्पांतर्गत उत्पादक ते ग्राहक थेट संत्रा विक्री उपक्रम राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजिल्याची माहिती आशिष वानखेडे यांनी दिली.

वानखेडे म्हणाले विदर्भातील त्या शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला दर मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कृषी समृद्धी प्रकल्प अमरावती महाऑरेंज यांच्या संयुक्त विद्यमाने विक्री उपक्रम आयोजिला आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, आैरंगाबाद, नाशिक, ठाणे, अलिगाब, सातारा, सांगली सोलापूर जिल्ह्यांसह शेजारच्या आंध्र प्रदेश, तेलंगणा कर्नाटक राज्यांत संत्री पाठवण्यात येतील.
पश्चिम विदर्भात सध्या संत्र्यांचे दर फक्त सात ते दहा रुपये प्रतिकिलो इतके कमी आहेत. व्यापारी माल घेण्यास तयार नसून संत्रा उत्पादक शेतकरी संकटात अडकलेत. सोलापूर जिल्ह्यात कृषी विभागाच्या मदतीने लवकरच विक्री केंद्र सुरू होणार असून त्याबाबतची माहिती कृषी विभागातर्फे लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.”