आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत संपल्याच्या दुसऱ्या दिवशी बाजार समितीवर प्रशासक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपली. त्यामुळे प्रशासकाने पदभार घ्यावा आणि निवडणूक घ्यावी, असा अादेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्तीचा विषय आता संपला आहे.
न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि मकरंद कर्णिक यांनी मंगळवारी निकाल जाहीर केला. या संदर्भात सोमवारी सुनावणी पूर्ण झाली होती. पण िनकाल राखून ठेवण्यात आला होता. तो लगेच दुसऱ्या दिवशी देण्यात आला. तो मिळताच सहकार खात्याचे शहर उपनिबंधक कुंदन भोळे यांनी सायंकाळी साडेपाचला प्रशासक म्हणून पदभार घेतला. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पुढील कामकाज होईल, असे त्यांनी सांगितले.

बाजार समितीच्या कारभाराविषयी मावळते संचालक राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे यांनी फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन सहकार पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्या वेळचे जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी चौकशी केली. दरम्यान, १२ जूनला त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी नारायण आघाव रूजू झाले. त्यांनी लावंड यांच्या चौकशी अहवालातील मुद्द्यांना जबाबदार धरून २९ नोव्हेंबर रोजी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाच्या विरोधात बाजार समितीच्या संचालकांनी न्यायालयात दाद मागितली. पण, ही न्यायालयीन प्रक्रिया योगायोगाने संचालक मंडळाची मुदत संपते, त्याच दिवशी संपली. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्तीचा विषय संपला आणि मुदत संपल्याने बाजार समिती प्रशासकाच्या ताब्यात देण्याचा निर्णय झाला आहे.
अहवालातील मुद्द्यांना जबाबदार धरून २९ नोव्हेंबरला संचालक मंडळ बरखास्त करण्याचा आदेश दिला होता. त्याच्या विरोधात संचालकांनी न्यायालयात दाद मागितली. पण, ही न्यायालयीन प्रक्रिया योगायोगाने संचालक मंडळाची मुदत संपते, त्याच दिवशी संपली. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्तीचा विषय संपला आणि मुदत संपल्याने बाजार समिती प्रशासकाच्या ताब्यात देण्याचा निर्णय झाला.

शेवटी न्याय मिळाला
^थेट निवडणुकीला सामोरे येता, राजशेखर शिवदारे आणि सुरेश हसापुरे यांनी बरखास्तीचा घाट घातला होता. बरखास्तीने स्वत:सह आम्हालाही अपात्र ठरवण्याचे मनसुबे होते. परंतु न्यायालयाने आम्हाला न्याय दिला. मी कुठल्याही मंत्र्यांवर आक्षेप घेत नाही. दिलीपमाने, मावळते सभापती

एवढ्याने सुटले नाहीत
^केवळ संचालक मंडळाची मुदत संपल्याने न्यायालयाने बरखास्तीविषयी भाष्य केले नाही. परंतु आमचा मूळ दावा अद्याप प्रलंबित आहे. निवडणूक होऊन नवीन संचालक मंडळ आले तरी त्याची जबाबदारी संपणार नाही. मलाही माजी संचालक म्हणून ती स्वीकारावी लागेल. राजशेखर शिवदारे, तक्रारदार
बातम्या आणखी आहेत...