आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड वर्षात 36 हजार शेतकऱ्यांना मिळाले 1 रुपयात पोटभर भोजन, कृषी उत्पन्न बाजार समितीची योजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री सिद्धेश्वर बाजारपेठेत पूर्णब्रह्म नामक योजना दीड वर्षापूर्वी सुरू करण्यात आली. याद्वारे शेतकऱ्यांना केवळ रुपयात पोटभर जेवण देण्यात येते. मागील वर्ष आणि पाच महिन्यांच्या कालावधीत सुमारे ३६ हजार २५० शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत समाधानाची ढेकर दिली आहे. 

 

जून २०१६ रोजी या योजनेला सुरुवात झाली. शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना सोलापुरात आल्यानंतर दररोज बाहेरचे भोजन परवडत नाही. त्यांचा अतिरिक्त खर्च होऊ नये आणि जेवणाअभावी त्यांना त्रास होऊ नये म्हणून “पूर्णब्रह्म’ योजनेची सुरुवात करण्यात आली. बनशंकरी बचत गटाच्या अनुराधा कुलकर्णी यांना हे भोजनालय चालवण्यास देण्यात आले आहे. ही योजना व्यवस्थित चालावी यासाठी प्रती जेवणामागे बाजार समिती १९ रुपये, आडते १० रुपये आणि शेतकरी रुपया असे ३० रुपयांचे जेवणाच्या थाळीचे नियोजन करण्यात आले आहे. 

 

बाजार समितीतर्फे आडत्यांना कूपन देण्यात आले आहेत. तेथून शेतकऱ्यांना नाव टाकलेल्या कुपनच्या दोन प्रति देण्यात येतात. भोजनालयात येऊन कूपन रुपया देऊन भोजन करता येते. कुपनची एक प्रत बाजार समितीला तर एक प्रत उपाहारगृह चालकाला देण्यात येते. दररोज किमान ३० आणि जास्तीत जास्त ८० ते ९० शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. दररोजची भोजनालयाची वेळ सकाळी १० ते दुपारी अशी आहे. या वेळेत शेतकऱ्यांना जेवण देण्यात येत असल्याचे अनुराधा कुलकर्णी यांनी सांगितले. 

 

कूपन देण्यास टाळाटाळ केल्यास तक्रार करा 
बाजारसमितीमार्फत आडत्यांना शेतकऱ्यांना देण्यासाठी कूपन देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून कूपन घेणे आवश्यक आहे. कूपन देण्यास कोणी आडते टाळाटाळ करत असेल तर शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार करावी, असे प्रभारी सचिव विनोद पाटील यांनी सांगितले आहे. 

 

असा आहे जेवणाच्या थाळीतील मेनू 
शेतकऱ्यांना जी थाळी दिली जाते त्यामध्ये चपाती, सुकी भाजी, पातळ भाजी किंवा आमटी, लोणचे, शेंगा चटणी, सीझन नुसार काकडी नाहीतर कांदा सलाड म्हणून देण्यात येतो. याशिवाय वाटी भात आणि हवी तेवढी भाजी दिली जाते. 

बातम्या आणखी आहेत...