आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीत होणार 5 कोटींचे काँक्रिट रस्ते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रह्मदेव दादा यांचा पुतळा - Divya Marathi
ब्रह्मदेव दादा यांचा पुतळा
सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खराब रस्त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. आता लवकरच ही समस्या मिटणार असून महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम विकास प्रकल्पांतर्गत पाच कोटी रुपयांचे काँक्रिट रस्ते होणार असल्याची माहिती सभापती दिलीप माने यांनी दिली.
बाजार समितीतील खराब रस्त्यामुळे चिखल होणे, जडवाहने खड्ड्यात फसणे, कृषी माल खराब होणे आदी प्रकार होतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही समस्या लक्षात घेऊन सभापती दिलीप माने यांनी चांगले रस्ते करून देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम विकास प्रकल्प कार्यालयाकडे पाठविला होता. त्यानंतर २३ जुलै रोजी विकास प्रकल्प विभागाकडून सागर चव्हाण श्री. गुप्ता यांनी बाजार समितीची पाहणी केली. काही बदल सूचवित या पथकाने प्रस्तावित आराखड्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे बाजार समितीत पक्के काँक्रिट रस्ते लवकरच होणार आहेत. याशिवाय या प्रकल्पाअंतर्गत गटारी भूमिगत वायरिंग कनेक्शनसह एकूण चार रस्ते होणार आहेत.
ब्रह्मदेव दादांच्या पुतळ्याचे 3 ऑगस्टला अनावरण
बाजार समितीत येत्या 3 ऑगस्ट रोजी विविध विकासकामे आणि सहकार तपस्वी ब्रह्मदेवदादा माने यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री पतंगराव कदम, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.
नवे प्रकल्प हाती
रस्ते,पाणी अन्य समस्यांतून शेतकरी आडते यांची मुक्तता व्हावी म्हणून बरेच नवे प्रकल्प हाती घेतलेले आहेत. त्यातीलच हा एक टप्पा आहे. याशिवाय नवीन लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ, स्वच्छतागृह आदी कामे सुरू करीत आहोत. दिलीपमाने, सभापती