आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बंद’ बाजार समिती आवारात, व्यापारी रस्त्यावरील बाजारात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भाजीपाला व फळे आडतमुक्त करण्याचा आदेश राज्य शासनाने काढला. पण त्याच्या विरोधात आडते, व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. त्यामुळे बाजार समितीचे प्रवेशद्वार शेतकऱ्यांसाठी बंद झाले. त्याने समितीच्या आवारात शुकशुकाट पसरला तरी बाहेरील रस्त्यावर खरेदी-विक्रीचा गजबजाट आहे. बाहेर शेतमालाची देवाण-घेवाण सुरू झाली आहे.
शासनाने केलेल्या नियमनमुक्त बाजार समित्यांची संकल्पना मांडत, शेतकरी हिताचा निर्णय घेतला. पण अाडते आणि व्यापारी हेका सोडायला तयार नाहीत. त्यांनी बंद पुकारून शेतकऱ्यांना समितीच्या आवाराचे प्रवेशद्वार बंद केले. हा बंद अावारात शंभर टक्के यशस्वी आहे. बाहेर मात्र सुरळीत व्यापार अाहे. त्यामुळे आडतमुक्त बाजार समितीची ऐशीतैशी झाली. शेतकरी मात्र नित्य शेतमाल आणतो आणि रस्त्यावर बसून विकून जातो. आडत्यांपेक्षा अधिक मोबदला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. पण हे कुठंवर चालणार? बाजार समिती यात हस्तक्षेप करणार नाही का? असे प्रश्न त्याच्या समोर उभे आहेत.
शेतकरी हिताचा निर्णय
आडतबंदकरून शासनाने शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णय घेतला. त्याने बळीराजाची लूट थांबेल. आता खरी कसोटी बाजार समितीची आहे. बाजार समिती कोणासाठी आहे हे कळेल. ययाती गरड, शेतकरी, रानमसले तालुका उत्तर सोलापूर
शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन
शेतकऱ्यांना आताकुठे ‘अछे दिन’ येत आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांच्या जीवावर कोट्यवधी कमावणारी बाजार समिती आडमुठ्या व्यापाऱ्यांसमवेत युती केली. शासन निर्णय पायदळी तुडवला. त्याच्या विरोधात आंदोलन उभे करणार. प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, जनहित शेतकरी संघटना
कोटींचे नुकसान
आडत व्यापाऱ्यांनी सौदे बंद ठेवल्याने बाजार समितीमध्ये सर्वत्र शुकशुकाट आहे. दिवसभरात जवळपास ते कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. श्री.दळवी, सचिव बाजार समिती
व्यापारी म्हणतात...
शासनाच्यानिर्णयाविरोधात भूमिका मांडण्यासाठी व्यापाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. आडतमुक्त भाजीपाला फळे ही संकल्पनाच चुकीची असल्याचे मत मांडले. १९५४ पासून शेतकरी व्यापारी यांचे संबंध चांगले आहेत, असे मत व्यापाऱ्यांनी मांडले. रियाज बागवान, मुस्ताक चौधरी, सादिक बागवान, रेवणसिद्ध आवजे, सिद्रामप्पा हलसुरे, संभाजी भोसले, राजन जाधव आदी या वेळी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्याने मंगळवारी बाजार समितीमध्ये आडत दुकाने बंद होती.
ही लूट थांबण्यासाठीच...
> उघडलिलाव पद्धतीतही वंदा, पत्ती, यमलेदू अशी सांकेतिक भाषा वापरली जाते
>शेतकऱ्यांच्या पट्टीच्या मागे अध्यक्षाच्या नावाने दोन टक्क्यांची बेकायदा कपात
>कांदा इतर शेतमालाची सुरक्षा रक्षकाच्या संगनमताने राजरोस लूट होते.
>रोखपट्टीचा नियम असताना महिनाभर वाट बघावी लागते.
>‘फसकी’च्या नावाखाली शेतकऱ्यांच्या मालाची लूट
बाहेरचा बाजार असा चालतो
बाजार समिती आवारात मंगळवारी बंद पाळण्यात आला. कृषिमालाचे एकही वाहन आवारात जाऊ दिले नाही. परगावाहून येणाऱ्या काही शेतकऱ्यांना ‘बंद’ माहीत नाही. त्यांनी आपला माल नेहमीप्रमाणे आवारात नेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी अडवल्याने त्यांना परतीचा मार्ग धरावा लागला. पण पुणे महामार्गावर काही जणांनी माल उतरून घेतला. समितीच्या पाठीमागे देवाण-घेवाणीचे काम सुरू होते.
बातम्या आणखी आहेत...