आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर नाव; धनगर आरक्षणावर लवकरच निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर यांचा शासन योग्य सन्मान करेल, असेही ते नागपुरात आयोजित धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्यात म्हणाले. 

राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या शब्दावर आपण आजही ठाम आहोत. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. ताे मिळताच तत्काळ छाननी करून राज्य सरकार केंद्राकडे धनगर आरक्षणाची शिफारस करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता हे धनगर समाजाला आरक्षण दिले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 
 
‘टाटा’चा अहवाल येताच धनगर अारक्षण शिफारस ‘राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्यासंबंधीचा टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा  (टीस) अहवाल लवकरच प्राप्त हाेईल. ताे मिळताच तत्काळ अहवालाची छाननी करून राज्य सरकार केंद्राकडे धनगर आरक्षणाची शिफारस करेल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले. धनगर समाजातील युवक-युवतींना आरक्षणासोबतच आर्थिक सक्षम करण्यासाठी वसतिगृह, शिष्यवृत्ती, शिक्षण व स्पर्धा परीक्षा यासाठी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी योजना तयार करून द्यावी, शासन त्यास मान्यता देईल,’ असे त्यांनी सांगितले. दरम्यान, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.   

नागपुरात अायाेजित धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, खासदार विकास महात्मे उपस्थित होते.   मुख्यमंत्री म्हणाले की, कुठल्याही समाजाला आरक्षण देण्यासाठी वस्तुनिष्ठ अहवाल बंधनकारक आहे. संविधानाच्या तरतुदीत बसणारा हा अहवाल तयार करण्यासाठी राज्य शासनाने ‘टीस’ संस्थेची नियुक्ती केली होती. या संस्थेने धनगर समाजातील नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सादर केलेले प्रत्येक निवेदन स्वीकारले. २० पेक्षा जास्त जिल्ह्यांत जाऊन, लाखो लोकांशी मिळून तथ्य संकलन केले. यासोबतच आठ राज्यांना भेटी देऊन माहिती गोळा केली आहे.  हा अहवाल धनगर समाजाबाबतचा ऐतिहासिक दस्तऐवज असणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.   
 
‘टीस’चे अहवाल लेखनाचे काम  ुरू असून या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. हे काम डिसेंबरअखेर पूर्ण हाेईल. धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या शब्दावर आपण ठाम आहोत. अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता हे आरक्षण दिले जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...