आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देहविक्री करणाऱ्यांच्या पन्नास पाल्यांना मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - देहविक्री करून चरितार्थ चालवणाऱ्या महिलांच्या मुलांना शालेय साहित्य आर्थिक मदत देण्यात आली. दहावी बारावीतील सुमारे ५० विद्यार्थी-विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला. क्रांती महिला संघ, लायन्स क्लब अश्विनी सहकारी हॉस्पिटल यांनी संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला. रविवारी झालेल्या कार्यक्रमात पाल्यांचा सत्कारही झाला.
प्रतिकूल परिस्थितीत मुलांचे शिक्षणही महत्त्वाचे आहे. या कामी क्रांती महिला संघाचा पुढाकार असल्याचे या वेळी पालकांनी मान्य केले. विजापूर रस्ता परिसरातील संघाच्या कार्यालयात पहिल्यांदाच कार्यक्रम झाला. यावेळी हॉस्पिटलचे अध्यक्ष बिपीनभाई पटेल, लायन्स क्लब सोलापूर मिडटाऊनचे अध्यक्ष आनंद सागर, महेश नरे, लायन्स क्लब ऑफ सोलापूर डॉ. माधुरी अवसेकर, सुनंदा शेंडगे, संघाच्या अध्यक्षा काशिबाई जाधव, प्रकल्प व्यवस्थापिका रेणुका जाधव, दीपक गुंजे, अनिल गोडबोले आदी उपस्थित होते.
देहविक्री करणाऱ्यामहिलांसाठी क्रांती महिला संघाचे कार्य खूप जुने आहे. आम्ही केवळ यात खारीचा वाटा उचलला आहे. यापुढेही काही मदत हवी असल्यास आम्ही तत्पर आहोत.” बिपीनभाई पटेल, अध्यक्ष, अश्विनी रुग्णालय
परिस्थितीने आम्हीया व्यवसायात आलो. परंतु आमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.” रसिकाराठोड, देहविक्री महिला (नाव बदलले आहे)
बातम्या आणखी आहेत...