आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान कंपन्यांचे तांत्रिक पथक चाचपणी करणार, हवाई उड्डयन मंत्री राजू यांची ग्वाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विमानतळावरून सेवा सुरू करण्याची चाचपणी करण्यासाठी हवाई सेवा देणाऱ्या कंपन्याची टीम सोलापुरात येण्याची शक्यता आहे. जूनच्या अखेर कंपन्याची तांत्रिक विभागाची टीम येईल, अशी ग्वाही हवाई उड्डयन मंत्री अशोक गजपती राजू यांनी दिली असल्याची माहिती आकाश एअर ट्रॅव्हलरचे संचालक नेताजी मोरे यांनी सांगितले.

नुकतेच मोरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. स्मार्ट सिटीत निवडलेल्या सोलापूरला विमानसेवा सुरू होणे गरजेचे असल्याने गडकरी यांनी लक्ष घालण्याची विनंती राजू यांना केली आहे. जेट एअरवेज स्पाइस जेट या दोन विमान कंपन्यांशी सध्या संपर्क झाला आहे. यावेळी सोलापूर विमानतळावरील रनवे आदी महत्त्वाच्या बाबींची पाहणी केली जाणार असल्याची माहिती नेताजी माेरे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...