आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप हा शेटजी- भटजींचाच पक्ष, अजित पवार यांची पुन्हा एकदा प्रखर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - ‘भाजप हा शेटजी-भटजींचा पक्ष आहे. गाेपीनाथ मुंडेंसारख्या बहूजन नेत्यांचा या पक्षाने केवळ सत्ताप्राप्तीसाठी उपयाेग करुन घेतला. नंतर मात्र ‘मास लिडर’ बहूजन नेत्यांना बाजूला सारत नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, सुरेश प्रभू यांच्यासारखे नेते सत्तेत मिरवत आहेत’, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.

सोलापूर जिल्ह्यातील पिंपळनेर येथे (ता. माढा) येथे मंगळवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘भाजप हा शेटजी- भटजींचा पक्ष आहे, असे मी लहानपणी ऐकायचो. गाेपीनाथ मुंडे, अण्णा डांगे, ना.स. फरांदे अशा व्यक्तींनी भाजपला खऱ्या अर्थाने बहुजन चेहरा मिळवून दिला. मात्र, सत्ता आल्यानंतर ते अडगळीत पडले आणि गडकरी, जावडेकर, प्रभू आणि पीयूष गोयल यासारखी मंडळी सत्तेतील पदे घेऊन मिरवत आहेत. यावरुन भाजप हा पक्ष केवळ बहुजन समाजाचा वापर करून घेत असल्याचेच दिसून येते. मोदी आणि फडणवीस यांनी फुले, शाहू, आंबेडकरांची विचारसरणी खुंटीला टांगून ठेवले अाहे, असा अाराेपही त्यांनी केला.

सगळा अाेघ विदर्भाकडेच
भाजपच्या सत्तेतील मुख्यमंत्र्यांसह बहूतांश महत्त्वाची पदे, मंत्रिपदे विदर्भाकडे अाहेत. या भागातील नेते उर्वरित महाराष्ट्राचा माेठ्या प्रमाणावर निधी सध्या विदर्भाकडे खेचून नेत असून त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रावर भाजपकडून अन्याय केला जात अाहे, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...