आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमित्त मेळाव्याचे, राष्ट्रवादी फुंकणार रणशिंग निवडणुकीचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मरगळ दूर करण्यासाठी आगामी मनपा, जिल्हा परिषद नगरपालिका निवडणूक पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांची मरगळ अंतर्गत गटबाजी थांबविण्यासाठी अजित पवार यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे. शिवाय आगामी निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाणार? याचेही उत्तर या दौऱ्यातून मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील पंधरवड्यात ते येणार असल्याचे जाहीर करूनही अालेच नव्हते.
िजल्ह्यातील स्थितीबाबत बोलायचे झाल्यास राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या करमाळा, पंढरपूर मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीला अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. पंढरपूर तालुका बालेकिल्ला असतानाही आज या तालुक्यात पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. मोहोळचे आमदार रमेश कदम सध्या तुरुंगात असल्याने विकास कामांवर परिणाम झाला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्याकडे तालुक्याचे नेतृत्व असले तरी विकास कामांना लागलेला ब्रेक हा विषय निवडणुकीत कळीचा ठरणार आहे. करमाळा तालुक्यात आगामी नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार नारायण पाटील गट सक्रिय राहण्याची शक्यता आहे. नगरपालिकेत विविध आघाड्यांमुळे पक्षांना फटका बसणार आहे. या स्थितीत तालुकापातळीवरील संघटन, पदाधिकारी, नियुक्ती हा मुद्दाही बैठकीत महत्त्वाचा ठरणार आहे.

विरोधकांना असणार धक्का...
बुधवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या जाहीर मेळाव्यात काही तालुक्यातील कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र ते नेते कार्यकर्ते कोण असणार? हे सांगण्यास जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी नकार दिला. पक्षाच्या शहरातील विविध आघाड्यांचे पदाधिकारीही लवकरच जाहीर होतील, अशी माहिती शहराध्यक्ष भारत जाधव यांनी दिली.

पवार गटबाजीवरचा शोधतील उपाय
शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या निवडीनंतरही पक्षशिस्तीची स्थिती बदललेली नाही. पक्षीय बैठकांना अनेक माजी अध्यक्षांची दांडी असते. काही निवडक पदाधिकारी नगरसेवकच मत व्यक्त करतात. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, तुम्ही गटबाजी रोखा, अन्यथा नवख्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन निवडणुकांना सामोरे जाऊ, असा इशाराच दिला होता. आता खुद्द अजित पवार बुधवारी कोणता निर्णय घेणार? कोणत्या सूचना करणार? बुधवारी सकाळी शासकीय विश्रामगृहावर शहर, जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक, जिल्हा परिषदेत पुरस्कार वितरण मेळावा असे दौऱ्याचे स्वरूप आहे.
बातम्या आणखी आहेत...