आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांना सत्तेत नाही स्थान, पवारांची दिलगिरी, सव्याज परतफेडीचा शब्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कांॅग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी शहर कार्यकारिणी आणि निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त सत्तेत स्थान मिळत नसल्याचे गाऱ्हाणे मांडले. त्यावर श्री. पवार यांनी दिलगिरी व्यक्त करत सव्याज परतफेडीचे आश्वासन देत त्यांना शांत केले. संख्येनुसार महिलांना स्थान मिळाले पाहिजे, असे म्हणाले.
आमचा उपयोग केवळ वक्ता म्हणून केला जातो. बायोडेटा दिल्यावर नोकरी लावायचे काय, असे विचारले जाते. शरद पवार यांच्या विचाराने भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्याचे सांगत वैशाली गुंड यांनी आपली व्यथा मांडली तर नगरसेविका बिसमिल्ला शिकलगार यांनी गेल्या पंधरा वर्षात एकही पद मिळाले नसल्याचे सांगतिले. नगरसेवक मनोहर सपाटे यांच्याबरोबर निवडून आल्याने पाच वर्षात एकही पद दिले नसल्याचे नगरसेविका सुवर्णा कारंडे यांनी सांगतिले. युवकांना संधी देण्याची मागणी सायली शेंडगे यांनी केली. त्यावर पुढील वेळी नगरसेविकांच्या संख्येनुसार वाटा देऊ असे अजित पवार यांनी सांगितले.


सव्याज परतफेडीचा शब्द
दिली जाईल, पण त्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार काम करावे असे पवार म्हणाले. यावेळी शहर अध्यक्ष भारत जाधव, सोलापूरचे प्रभारी प्रदीप गारटकर, माजी आमदार युन्नस शेख, जनार्दन कारमपुरी, उपमहापौर प्रवीण डोंगरे, महेश गादेकर, मनोहर सपाटे, पिरअहमद शेख, दिनेश शिंदे, महेश निकंबे आदी उपस्थित होते.

रोज पाणीपुरवठ्याचे काय झाले
मागील महापालिका निवडणुकीत रोज पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले त्याचे काय, असा सवाल पवार यांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, आम्ही सत्तेत असताना त्यासाठी प्रयत्न केले. सत्ता बदलल्यावर मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन बैठक लावण्याचा प्रयत्न केला. एनटीपीसीचे पाणी शहरासाठी देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.

आघाडीचा निर्णय स्थानिक नेत्यांवर
युतीचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेण्यात येईल असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आधीच सांगितले आहे. कांॅग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवरच होईल असा सूर आळवला आहे. बुधवारी श्री. पवार यांनीही अशी भूमिका मांडली. स्थानिक परिस्थिी पाहून स्थानिक पदाधिकारीच निर्णय घेतील असे ते म्हणाले. श्री. पवार यांच्या सूचनेनुसार २० आॅक्टोबर रोजी शहर उत्तर तर २६ रोजी शहरमध्ये आणि दक्षिण मतदार संघातील कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात येणार आहेत.

^ अजित पवार यांनी आमचे मत शांतपणे एेकून घेतले. महिलांचा विषय विनोदाचा होऊ नये. मी तक्रार केले नाही तर एक महिला म्हणून येणाऱ्या अडचणी मी मांडल्या आहेत. वैशालीगुंड, राष्ट्रवादी कार्यकर्त्या
^मी झोपडपट्टीत राहणारी. पक्षाने तिकीट दिले. तीनवेळा नागरिकांनी निवडून दिले. पण पक्षाने मला पद दिले नाही, असे मी अजितदादा यांच्यासमोर सांगितले. त्यांनी माझे ऐकून घेतले. पुढच्या वेळी व्याजासह परत करू असे सांगून माझे समाधान केले. बिसमिल्लाशिकलगर, नगरसेविका
बातम्या आणखी आहेत...