आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: पद्मशाली शांतीधामात हिरवळ आणण्याचा महिलांचा संकल्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अक्कलकोट रस्ता परिसरातील पद्मशाली स्मशानभूमीत पाच हजार झाडे लावून हिरवळ आणण्याचा संकल्प सप्तश्रृंगी महिला मंडळाने केला आहे. प्रभाग क्रमांक नऊच्या नगरसेविका रामेश्वरी बिर्रू यांच्या नेतृत्वाखाली १५ महिला एकवटल्या. त्यांनी कामाचा श्रीगणेशाही केला. 
 
पद्मशाली ज्ञाती संस्थेची ही सर्वात मोठी स्मशानभूमी. परंतु उजाड माळरानासारखी पडून आहे. खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी १५ लाख रुपयांचा निधी देऊन ५० हजार लिटर पाण्याची टाकी बांधून दिली. त्यामुळे येथे पाण्याचा प्रश्न सुटला. तिथे हात-पाय धुण्याच्या पाण्याचा अपव्यय होतो. ते झाडांसाठी वापरण्याचे ठरले. खासदार बनसोडे यांच्या हस्ते एक रोप लावून या हरित कामाला सुरुवात झाली. या वेळी ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे, सरचिटणीस सुरेश फलमारी आदी उपस्थित होते. 
 
रोपदेण्याचे आवाहन : कुटुंबातीलमृत व्यक्तीच्या नावे एक रोप सप्तश्रृंगी महिला मंडळाकडे सुपूर्द करावे. शांतीधामात त्याचे संगोपन करण्याचे काम मंडळाचे. रोप देताना, मृत व्यक्तीच्या अग्निसंस्काराची राखही द्यावी. त्याचे खत म्हणून वापर करण्यात येईल. इतकेच काय, अस्थी विसर्जनासाठी अनेक लोक नदीच्या संगमावर, पंढरीच्या चंद्रभागेत जातात. त्याऐवजी या अस्थी रोपांच्या खड्ड्यात पुरल्या तर तिथे वृक्ष होईल. व्यक्तीचे नाव चिरंतन राहील. कर्मकांडाची ही प्रक्रिया पर्यावरणपूरक आहे. त्याला काही पुरोहितांनीही संमती दिली. उलट पाण्यात रक्षा विसर्जन केल्यास जलप्रदूषण होते. ही बाब लक्षात घ्यावी. 
 
...तर पूर्वभाग स्मृतिवन 
- पद्मशाली स्मशानभूमीत काही अनिष्ट प्रथा होत्या. त्या आता संपुष्टात आल्या. पाण्याची टाकीही झाली. परिसर हिरवळीने नटला तर पूर्वभागातील स्मृतिवन होण्यास वेळ लागणार नाही.” रामेश्वरी बिर्रू, नगरसेविका 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...