आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटातील ‘मोटू पतलू’त जान आणणारा सोलापूरचा अक्षय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भारतीय तंत्रज्ञान आणि भारतीय समाजाशी भावनिक ऋणानुबंध जोडणारी मोटू पतलू या कार्टूनची जोडी फिल्मच्या माध्यमातून जगासमोर आली. विविधतेने नटलेल्या भारतीय मूल्यांचा आणि भावनिकतेचा समावेश त्यांच्या या कलाकृतीत दिसून येतो. सोलापुरातील अक्षय चव्हाण याचा या फिल्ममध्ये महत्त्वाचा सहभाग दिसून आला आहे.
मोटू पतलू ही ३डी फिल्म असून यातून लहान मुलांना सामाजिक वनसंवर्धन, मैत्री कशी असावी, अपेक्षा करता मित्रांच्या उपयोगी कसे पडावे याचा संदेश या मोटूपतलूच्या जोडीने दिला आहे. अॅनिमेशन फिल्म ही पूर्णपणे चित्रांच्या सहाय्याने उभी केलेली असते. ही फिल्म पाहताना प्रेक्षकांना त्यात हरवून गेल्यासारखे वाटते. या फिल्मसाठी २० कलाकारांनी अतिशय मेहनत घेतली असून रेषातला अभिनय त्यातली कला यात अतिशय कल्पकतेने मांडलेली असते. सुहास कडव यांनी मोटू पतलू या सिरीजद्वारे भारतातील अनेक होतकरू तरुणांना आपली कला जगासमोर आणण्याची संधी दिली. यात कोअर टीममध्ये अक्षय चव्हाण याचाही समावेश आहे.

टीमची एकी
फिल्मच्या कोअर टीममधील सर्वात तरुण कलाकार अक्षय म्हणतो, अतिशय खेळीमेळीने आम्ही हा चित्रपट बनवला असून आमच्या टीमच्या एकीमुळे ही फिल्म अतिशय उत्कृष्ट बनली. आधी तीन महिनेे अथक काम करत होतो. काॅसमाॅस माया डिजिटल स्टुडिओ येथे आम्ही काम पूर्ण केले.

एखादे कल्पनाविश्व मुलांसमोर उभे करायचे म्हटल्यावर त्यात जिवंतपणा हवा. प्रत्येक सीनचा प्रयत्नपूर्वक अभ्यास केला. तो सीन आम्ही स्वत: जगलो. अगदी सर्कसचा सीन करताना आम्ही सर्व टीमसदस्य सर्कशीला गेलो. तेथील प्राण्यांचे वागणे, हावभाव यांचेही आम्ही निरीक्षण केले. त्या अनुभवातून खेळ रंगवला. फिल्म आपली वाटावी म्हणून आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले. कारण आधीची सिरीयल भारतीय नव्हती. त्यामुळे ताडी, बाभूळ झाडांच्या सहाय्याने चित्रांची रचना केली.

आवडीचे काम
^शिक्षकपालकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे कला क्षत्राकडे वळलाे. रेषातला अभिनय, कला मांडायला आईमुळे शिकलो. लहानपणी फिल्ममध्ये आपलेही नाव यावे असे खूप वाटायचे. दोन्ही भाऊ इंजिनिअर आहेत. करिअर निवडीत आईवडिलांनी स्वातंत्र्य दिले. याबाबत पालकांनीही चौकटीबाहेरचा विचार करण्याची गरज आहे. आवडीचे काम असल्याने ताण जाणवत नाही. आतून आलेल्या इच्छेमुळे ते काम ओपोआप होते.” अक्षयचव्हाण, प्री प्रोडक्शन सुपर वायझर
बातम्या आणखी आहेत...