आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयच्या घरात सोलापूरचा गणेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - हिंदी सिनेअभिनेता अक्षयकुमारला सोलापूरच्या खिलाडी ग्रुपने संगमरवरी मूर्ती पाठवली. यंदा गणेेशोत्सवात त्याने ती प्रतिष्ठापित केली. या मूर्तीचे फोटो अक्षयकुमार फेसबुकवर शेअर केले आहे. सोलापुरात अक्षयकुमारच्या चाहत्यांची खिलाडी ग्रुप नावाने संस्था आहे. अक्षयचा चित्रपटला चाहते मोठ्या संख्येने येतात. मोठे हार घालणे, त्याच्या वाढदिवसाला रक्तदान शिबिर, गरिबांना अन्नदान कपडे वाटणे असे उपक्रम घेतात.

परंतु यंदा त्यांनी खास एक संगमरवरी मूर्ती अक्षयकुमारला पाठवली. अक्षयकुमारने चाहत्यांनी पाठवलेल्या भेटीचा स्वीकार केला. विशेष म्हणजे चाहत्यांनी पाठवलेली गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना घरात केली आहे. या गणेश मूर्तीचे फोटो त्याने फेसबुकवर शेअर केले आहेत. तसेच मूर्ती बाबत व्टिटरवरून ट्विट केले आहे. मूर्ती तीन फुटाची आहे.

अक्षय कुमारचे व्टिट असे : सोलापूरच्या खिलाडी ग्रुपने पाठवलेली गणेश मूर्ती सुंदर असून ती घरात प्रतिष्ठापित केली आहे. सोलापूरच्या चाहत्यांनी माझ्या मनात स्थान निर्माण केले आहे. मूर्ती खूपच आकर्षक असल्याचे त्याने फोटोसह फेसबुकवर शेअर केले आहे.

खूप आनंद वाटला
^अक्षय कुमारयांना चाहत्यांनी गणेश मूर्ती पाठवली. आम्ही दिलेली मूर्ती अक्षय यांनी घरात प्रतिष्ठापना केल्याचे समजल्यानंतर खूप अानंद झाला. गणेशोत्सवातील खर्च टाळून पैसा नाम संस्थेला दान देणार आहोत. सुरेश जगलेकर, खिलाडीग्रुप, सोलापूर