आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alcoholic Person Remove From Train On Railway Minister Twit

रेल्वेमंत्र्यांना ट्विट करताच दारूड्यांना डब्यातून काढले, महिला प्रवाशाच्या मदतीला धावली यंत्रणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रात्रीच्या वेळी महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून मनमाड-सोलापूर प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या मदतीला रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची ट्विट यंत्रणा धावून आली. एस १० डब्यात अनारक्षित तिकीटधारक तसेच दारूड्या प्रवाशांनी मांडलेला उच्छाद रेल्वेमंत्र्यांना ट्विट करताच पुढच्याच स्थानकावर थांबला. आरपीएफ जवानांनी या गोंधळी दारूड्यांना डब्यातून हुसकावून लावले.

ही घटना अशी : अमृता देशमाने आपल्या वर्षीय माही या कन्येसह एप्रिलला महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून मनमाड-सोलापूर प्रवास करत होत्या. शयनयान दर्जाच्या डब्यात अमृता यांचे आरक्षित तिकीट होते. या एस १० डब्यात अनारक्षित तिकीटधारकांची प्रचंड गर्दी होती. त्यात काही दारुडेही होते. त्यांचा उच्छाद सुरू होता. त्यामुळे अमृता यांना स्वच्छतागृहाकडे जाणेही मुश्किल होऊन बसले. गाडीत तिकीट पर्यवेक्षकही हजर नव्हते. रात्रीची वेळ. अमृता यांना एक पाऊलही पुढे जाता येईना. स्वच्छतागृहाजवळ तर प्रवाशांचा मोठा घोळकाच. रात्री साडेदहाच्या सुमारास अमृता स्वच्छतागृहाकडेजाण्यासाठी बर्थवरून उठल्या तर समोर प्रचंड गर्दी. काही दारूड्यांनी गोंधळ मांडलेला. शेवटी अमृता यांनी फोनवरून आपले सासरे सुनील देशमाने यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी रेल्वेमंत्र्यांना ट्विट करण्यास सांगितले. मात्र अमृता यांच्याकडे ट्विटर उपलब्ध नव्हते. त्यांच्या पतीने ट्विटरवरून रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडे समस्या मांडली. लागलीच रेल्वे यंत्रणा कामाला लागली. सोलापूर रेल्वे नियंत्रण कक्षातून आदेश सुटले. गाडी येवला स्थानकावर येण्यापूर्वीच आरपीएफ जवान जातीने हजर होते. गाडी फलाटावर येताच त्यांनी एस १० डब्यात गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांना हुसकावून लावले. अमृता यांचा प्रवास सुखकर केला.