आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीय सलोख्यासाठी सर्वंकष प्रयत्न : सेनगावकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पोलिसांवर वर्षाच्या ३६५ दिवसातील २७५ दिवस कामाचा ताण असला तरी, तो सदैव शांतता अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करतो. सध्याला सण उत्सवांना सुरुवात झाली आहे. सर्वांनी जातीय सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी केले.

सोमवारी सायंकाळी पाच वाजता गांधीनगर येथील पोलिस आयुक्त कार्यालयात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले हाेते. यावेळी शहरातील जवळपास ७० ते ८० सदस्यांनी हजर राहात आपले म्हणणे मांडले. व्यासपीठावर आयुक्त सेनगावकर यांच्यासह उपायुक्त पौर्णिमा चौगुले, पालिका आयुक्त विजय कुमार काळमपाटील, पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण मान्यवर उपस्थित होते. यावेळी सदस्यांनी गणेशोत्सव मिरवणूक बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विविध सूचना समस्या मांडल्या. यात प्रा. नसीम पठाण यांनी पोलिसांना सहकार्य करावे. माजी नगरसेविका लता फुटाणे म्हणाल्या, कोणत्याही मिरवणुकीत दारू विक्रीवर बंदी घालण्यात यावी. नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी थेट आयुक्तांना तुमचे पोलिस ५०० हजार रुपये घेऊन अवैध धंद्यांना खतपाणी घालतात, असे सांगितले. मौलाना अजिम यांनी या बकरीद मध्ये गोवंश हत्या झाली नसल्याचे सांगितले. एका सदस्याने कुर्बानी वेळचा मासांचा तुकडा गणपती मंडळासमोर पडला तर वाद निर्माण होऊ शकतात, याकडे लक्ष द्यावे असे सांगितले.

मोर्चा होणार शांततेत
येत्या २१ तारखेला निघणारा मराठा समाजाचा मोर्चा हा मूक मोर्चा आहे. कोपर्डीच्या एका घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा निघणार आहे. मोर्चा शांततेत होईल याची दक्षता घ्यावी. ईद गणेशोत्सवात सर्वांनी सलोख्याने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...