आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All India Leval Chaild Drama Festival In Solapur

बालकलाकारांनी फोडले सामाजिक प्रश्नांना वाचा, लोककलेने संमेलनाचा दुसरा दिवस गाजवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सामाजिक प्रश्नांबरोबरच देशभक्ती आणि मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवत संमेलनाचा दुसरा दिवस स्थानिक बालकलाकारांनी गाजवला. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर ए. पी. जे. अब्दुल कलाम बालनगरीत एकापेक्षा एक सरस आणि दर्जेदार अशी समूह आणि एकलनृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणास नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह तमाम प्रेक्षकांना टाळ्या आणि शिट्यांचा मोह आवरता आला नाही.

बालनाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शहर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांनी नृत्ये सादर केली. मराठी मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्याद्वारे स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्याचा संदेश दिला. ज्ञानसागर प्रशालेने देशभक्तिपर गीतांवर नृत्य सादर करून जगभरातील देशांवर होत असलेले दहशतवादी हल्ले संपवण्याची आता वेळ आल्याचे सांगितले. यानंतर नांदणी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी वातावरणामध्ये आणखी जोश निर्माण करत महाराष्ट्राची संस्कृती सांगणाऱ्या गीतांवर दमदार नृत्याचे सादरीकरण टाळ्यांचा पाऊस पाडला. टाकळी येथील संगमेश्वर पब्लिक स्कूल नान्नज येथील जी. बी. घोडके प्रशालेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी येळकोट येळकोट जय मल्हार या गीतावर पारंपरिक नृत्य सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली.
पुढील स्‍लाइडवर पाहा संमेलनातील बालकलाकारांचे फोटो...