आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All India Level First Marathi Child Festival Start In Solapur

बालनाट्य संमेलन : मुलांच्या आनंदाला उधाण वारे शहरभर भिर भिर भिर भिरभिरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पहिल्या अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलनाला गुरुवारपासून सोलापुरात सुरुवात झाली. जणू मुलांच्या कलाविष्काराचे भिरभिरेच शहरभर फिरत होते. हुतात्मा स्मृती मंदिर, फडकुले सभागृह आणि हरिभाई देवकरण प्रशालेच्या खुल्या मैदानावर या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मूकनाट्य, लोकनाट्य, वगनाट्य, एकपात्री, समूहनृत्य, लोकगीतं अशा एक ना अनेक कलांना उधाण आले. चिमुकल्यांसह थोरमंडळी सहभागी झाले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सोलापूर उपनगरीय शाखेने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून चार दिवसांची भरगच्च सांस्कृतिक मेजवानीच दिली. शहर आणि जिल्ह्यातील बालकलाकारांना मंच उपलब्ध करून दिले. अगदी जिल्हा परिषद, महापालिका शाळेतील मुलांपासून बड्या इंग्रजी माध्यमांतील मुलेही त्यात सहभागी झाली.

यामुळे मुलांच्या उपजत कलेचा मार्ग मोकळा केला. पुण्या-मुंबईतील कलावंतांच्या तोडीने कलेचे सादरीकरण केले. दक्षिण तालुक्यातील काैठाळी माढ्याच्या पिंपळनेर गावच्या मुलांनी ‘हम भी कुछ कम नही’ हेच दाखवून दिले. प्रत्येक कलेत सामाजिक आशय दडला होता. तसेच त्यात स्वच्छतेचा संदेश, मुली वाचवण्याचे आवाहन, एकतेचे दर्शन, देशभक्तीचे वर्णन होते. चालू घडामोडींवर चिमुकल्यांचे भाष्यही मर्मभेदी ठरले. असहिष्णुतेची चर्चा त्यांच्या तोंडूनही आली. राज्यघटना हेच देश चालवण्याचे ग्रंथ असताना, त्याच्या जागी गीतेची चर्चा कशाला? असेही सांगून गेली.
बालनाट्य संमेलनातील ठळक बाबी

भिरभिऱ्यांनी सजले मंच
मुलांचेआवडते भिरभिरे हे संमेलनाचे बोधचिन्ह आहे. शाहू, फुले, आंबेडकर नाट्यनगरी : जितेश देढे रंगमंच (हुतात्मा मंदिर), बालकवी ठोंबरे नाट्यनगरी (निर्मलकुमार फडकुले सभागृह) आणि बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरीतील डॉ. एपीजे अब्दुल कलाम रंगमंच भिरभिऱ्यांनी सजले होते. सहभागी कलावंतांसह प्रमुख पाहुण्यांचे स्वागत भिरभिरे आणि फूल देऊन करण्यात आले. त्यामुळे सर्वत्र कलेचे भिर भिर भिर भिरभिरे फिरत होते. महापौर सुशीला आबुटे यांच्या हस्ते सकाळी मुख्य उद्घाटन सोहळा झाला. सायंकाळी साडेसहाला अब्दुल कलाम रंगमंच खुले झाले. मूकनाट्यातूनही ‘तिरंगा’ झळकला. तर २६/११ ची घटनाही सांगून गेला

हुतात्मा स्मृती मंदिरात लोकगीते, लोकनृत्य, समूहनृत्य आणि नाट्यछटा झाल्या
फडकुले सभागृहात एकपात्री नाटिका झाल्या. सामाजिक संदेशच देऊन गेल्या
हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर देशभक्ती गीत, नृत्याचा आविष्कार झाला
संमेलनाच्या बाहेर पुस्तके, खाऊची दुकाने थाटली गेली. जेवणाची व्यवस्था केली
प्रत्येक मंचावर सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते होते. वादाला कुठेच जागा नव्हती
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे उद्घाटनास आले नाहीत, ठोकळ यांनी उद्घाटन केले

पहिल्या अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलनाला गुरुवारी सोलापुरात सुरुवात झाली. महापौर सुशीला आबुटे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी सभापती पद्माकर काळे, कार्याध्यक्ष विजय साळुंके, शहाजी पवार, विश्वनाथ चाकोते, निर्मला ठोकळ, दिलीप कोरके, अजय दासरी, भारत जाधव, सुशीला आबुटे, संजय हेमगड्डी, पांडुरंग दिड्डी आदी उपस्थित होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा बालनाट्य संमेलनातील फाेटो...