सोलापूर - पहिल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलनाला गुरुवारी सुरुवात होत असून गेल्या दोन महिन्यांपासून याची तयारी करण्यात येत होती. ला गुरुवारी सुरुवात होत असून गेल्या दोन महिन्यांपासून याची तयारी करण्यात येत होती. सकाळी वाजता महापौरांच्या हस्ते हुतात्मा स्मृती मंदिरच्या शाहू-फुले-आंबेडकर नाट्य नगरीत जितेश देढे रंगमंचावर उद्घाटन होणार आहे. भव्य रंगमंच, वाहन, निवास, भोजन आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागातून आलेले कलावंत या संमेलनाची शोभा वाढवतील.
फडकुले सभागृह येथील बालकवी ठोंबरे नाट्य नगरी, हुतात्मा स्मृती मंदिर येथील शाहू-फुले-आंबेडकर नाट्य नगरी आणि हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे नाट्य नगरीत सकाळी १० ते रात्री १० पर्यंत विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. यामध्ये एकपात्री कथाकथन, नकला, बालनाट्य, नाट्य छटा, भारूड, एकलनृत्य, समूह नृत्य, वाद्य वादन, लोकधारा, लोकनृत्य, गायन असे अनेक कलाप्रकार सादर होणार आहेत. हुतात्मा स्मृती मंदिरात दोन्ही दिवस सोलापूरच्या स्थानिक कलावंतांचे कार्यक्रम सादर होणार आहेत.
महापौर सुशिला आबुटे यांनी संमेलनाच्या कार्यक्रमात निधी देईन असे आश्वासन दिले होते. संमेलनाचा दिवस उगवला तरी निधीचा आकडा कळालेला नाही. धनादेशही पदाधिकाऱ्यांच्या हाती आलेला नाही.
सुमारे ५० लाखांचे बजेट असणाऱ्या या संमेलनास लोकवर्गणीतून २५ लाख जमले आहेत. देऊ, मदत करू असे सांगणाऱ्या अनेकांनी ऐनवेळी काढता पाय घेतल्याने आर्थिक अडचण उभी राहणार आहे. सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधींनी तोंड फरवल्याने चणचण भासत असल्याची भावना काही ज्येष्ठ कलावंतांनी बोलून दाखवली.
बच्चे कंपनीसाठी भिरभिऱ्यांची भेट : या संमेलनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक बालकांना रंगीत भिरभिरे भेट दिले जाणार आहे. तसेच एक छान पिशवी, एक वही, एक पेन, जेवणाचे कूपन आणि संमेलनाचे बॅच याची किट भेट दिली जाणार आहे.
टी शर्टची असेल रेलचेल : सर्वातमहत्त्वाचे ठरेल ते टी शर्टस्. यावर बालनाट्य संमेलानाचा लोगो असेल. स्वयंसेवक, कलावंतांना टी शर्ट दिले जाणार आहेत.
सोलापूरकरांना आवाहन
^हे संमेलन आपले असून प्रत्येक कलावंत आपला असल्याच्या भावनेने सोलापूरच्या नागरिकांनी संमेलनाला प्रतिसाद द्यावा. यामुळे ते यशस्वी होणे सोपे होईल. हे संमेलन भव्य दिव्य करणे सोलापूरसाठी गौरवाचे असून सगळ्यांनी मिळून करणे गरजेचे आहे. त्यासाठी ज्या हातांनी आजवर मदत केली त्यांचे आभार आणि ज्यांना अजून मदत करता येते त्यांनी करावी.'' विजय साळुंके, कार्याध्यक्ष,अखिल भारतीय बालनाट्य संमेलन