आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच तालुक्यांत चाराटंचाई , छावण्यांची मागणी वाढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गेलीतीन महिने जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून जनावरांसाठी आज सर्वच तालुक्यांत चाराटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे चाराटंचाई असलेल्या तालुक्यांत चारा छावणी सुरू करावी, जनावरांना चारा उपलब्ध करावा, अशी मागणी दहा जणांनी केली आहे. यामध्ये आमदार भारत भालके, आमदार बबनराव शिंदे सिद्धाराम म्हेत्रे यांचाही समावेश आहे.
शिरापूर (ता. माेहोळ) येथील अनिल आबाजी पाटील, निंभोरे (ता. करमाळा) येथील सरपंच, धामणगाव (ता. बार्शी) येथील मोहन देशमुख यांनी जुलै महिन्यात चारा छावणी सुरू करण्याची मागणी केेली होती.

लक्ष्मीदहिवडी (ता. मंगळवेढा) येथील शिवलिंग स्वामी, करमाळा तालुक्यातील घोटी, साडे, वरकुटे, नेरले निंभोरे येथील सचिन पाटील इतर जणांनी चारा छावणी पाण्याची सोय करण्याची मागणी केली आहे. भोसे (ता. पंढरपूर) येथील हणमंतराव मोरे, कुंभारगाव (ता. करमाळा) येथील अध्यक्ष, श्रीराम पाणीपुरवठा संस्था यांनी मागणी केली आहे. याशिवाय माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे, अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी मतदारसंघामध्ये चारा छावणी टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे.

जिल्हा प्रशासनाने वरील १० ठिकाणी आलेल्या मागणीनुसार तालुकानिहाय मागणी आलेल्या ठिकाणी चाऱ्याची सद्यस्थिती काय आहे? याचा अहवाल देण्याचे संबंधित तहसीलदार प्रांताधिकारी यांना आदेश दिले आहेत. हा अहवाल जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे.

तीन आमदारांसह संस्थांचा समावेश
जिल्ह्यातचारा छावणी सुरू करण्यासाठी १० जणांनी मागणी केेली आहे. यामध्ये विद्यमान तीन आमदारांसह विविध संस्था सरपंच यांचा समावेश आहे. याबाबत तालुकास्तरावर चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. हे अहवाल जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला सादर करण्यात येणार आहे.” रमेशचव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी

हंगामात पुरेसा पाऊस झाल्याने चाऱ्याअभावी जनावरांचे हाल होत आहेत. त्यामुळे गावात चारा विकत घ्यावा लागत आहे. तातडीने चारा छावण्या, डेपो सुरू होणे आवश्यक आहे.”
मुस्तफाबागवान, शेतकरी, करकंब
एकट्या माढा तालुक्यात सव्वालाख जनावरे आहेत. माढ्यातून रोज दोन लाख ३० हजार लिटर दूधसंकलन आहे. चाऱ्याअभावी पशुपालक शेतकरी दोन हजार रुपये गुंठ्याने ऊस खरेदी करत आहे. तर दूधाचा भावही घसरला. आता त्याला जगवण्याची खरी गरज आहे. मात्र, प्रशासन ९० दिवस पुरेल इतका चारा असल्याचा अहवाल प्रशासनाने दिला, हे आश्चर्यकारक आहे.” बबनरावशिंदे, आमदार, माढा

पावसाअभावी जनावरांसाठी कोणत्याच भागात चारा नाही. पिण्याचे पाणी नाही. त्यासाठी चारा छावणीची मागणी केली आहे. अक्कलकोट शहरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्या पार्श्वभूमीवर ४० टँकरची मागणीही केली आहे. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे त्या गावांसाठी टँकरची मागणी केली आहे. ही वस्तुस्थिती असूनही प्रशासन डोळेझाक करत आहे.” सिद्धारामम्हेत्रे, आमदार, अक्कलकोट