आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर वाहने चालवताना नेहमी नियम पाळा, वालचंद इन्स्टिट्यूट येथे रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रस्त्यांवर वाहने चालवताना नियमांचे पालन झालेच पाहिजे. मात्र अनेक जण नियमांचे उल्लंघन करतात. आणि आपल्या बरोबरच इतरांचे जीवनदेखील धोक्यात घालतात. नागरिकांमध्ये सुरक्षित रस्ते वाहतुकीबाबत जागृती निर्माण व्हावी, या हेतूसाठी शासन प्रयत्न करते. वाहने चालवताना नियमांचे पालन करा नाही तर जीवन धोक्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी केले. 

सोलापूर पोलिस आयुक्तालय ग्रामीण पोलिस दल आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी वालचंद इन्स्टिट्यूट येथे रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटनाच्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सप्ताहाचे उद््घाटन पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांची उपस्थिती होती. या वेळी व्यासपीठावर पोलिस अायुक्त नामदेव चव्हाण, पौर्णिमा चौगुले, अपर्णा गीते, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी, सहायक पोलिस आयुक्त प्रशांत अमृतकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रणजितकुमार म्हणाले, महाराष्ट्रात सर्वाधिक रस्ते अपघात होतात. ही बाब विचार करायला लावणारी आहे. 

पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर म्हणाले, आताच्या काळात वाहतूक ही एक जटिल समस्या बनली आहे. परदेशात गुन्ह्यांची संख्या कमी आहे. तेथे रस्ते अतिशय चांगले आहे. वाहने वेगाने धावतात. तरीदेखील अपघातांची संख्या कमी आहे. तिथे प्रत्येक वाहन चालक नियमांचे पालन करतो. वय आणि उत्साह याचा मेळ घालायला हवा. रस्त्यावर अॅडव्हेंचर्स करण्याचा प्रयत्न करू नका. वाहनांची जेवढी गती अधिक ठेवाल तेवढा थकवा अधिक येईल. तेव्हा गती मर्यादित ठेवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. 
 
रस्त्यावर अपघात झाला असेल तर जखमींना वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. त्यांना त्या अवस्थेत सोडून जाऊ नका. सर्वोच्च न्यायालयाने या संबंधी आदेश दिले आहेत. पोलिसांची भीती बाळगता जखमींना मदत करण्याचे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले.