आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहार प्रकरणी कोरबू बडतर्फ, २३.७८ लाखांचा अपहार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका गलिच्छ वस्ती सुधारणा (गवसु) विभागातील कारकून अकबर अमर कोरबू यांना आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी बडतर्फ केले आहे. २३ लाख ७८ हजार २९१ रुपयांच्या अपहारप्रकरणी ते निलंबित होते. अपहाराची रक्कम त्यांच्या देय रकमेतून आणि स्थावर जंगम मालमत्तेतून वसूल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

कोरबू ३० सप्टेंबर २०१३ मध्ये वसुली भरण्यात हजार रुपयांची तफावत आली. बँकेचे स्टेंटमेंट मागवले असता, २.८९ लाख रक्कम बँकेत कमी भरल्याचे दिसून आले. कोरबू यांनी ०४९३ चलन बुक महापालिकेत जमा केले नाही. २.८९ लाखांचा अपहार झाल्याने याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकशी समितीने २३ डिसेंबर २०१३ रोजी आयुक्त कार्यालयास अहवाल दिला होता. त्यात २३ लाख ७८ हजारांचा अपहार झाल्याचे दिसून आले. बी. सी. हंगे यांच्याकडून चौकशी करण्यात आली. यात कोरबू यांच्यावर आरोप सिद्ध झाले. काेरबू यांनी खुलाशात आरोप फेटाळून लावत फेरचौकशीची मागणी केली होती.