आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील 192 गावांची यंदा ‘जलयुक्त शिवार’साठी निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जलयुक्त शिवार योजना ही राज्यशासनाची महत्वाची योजना आहे. जलस्तर वाढावा या हेतूने दोन वर्षापुर्वी जलयुक्त शिवार योजना सुरू झाली आहे. यावर्षी (२०१७ - २०१८ ) जिल्ह्यातून १९२ गावांची निवड करण्यात आली असुन मोर्शी तालुक्यातील सर्वाधिक २८ तर तिवसा तालुक्यातील केवळ गावांची निवड करण्यात आली. 
 
यावर्षी योजनेत निवड झालेल्या १९२ गावांची कामे जलदगतीने करावीत असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शुक्रवारी (दि. ३) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जलयुक्त शिवारच्या आढावा बैठकीत दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
 
 जलयुक्त शिवार योजनेचे हे तिसरे वर्ष असुन २०१६- २०१७ मधील एकुण ४१७५ कामे आहेत. त्यापैकी ३७२५ कामांचे अंदाजपत्रक तयार झाले आहे. प्रशासकीय मान्यता ३२५४ कामांना प्राप्त झाली आहे. १२८४ कामांची निविदा पुर्ण झाली आहे. १८३० कामांची वर्कऑर्डर देण्यात आली आहे.
 
९५६ काम पुर्ण झाली असुन ९५९ कामे सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. यावेळी जलयुक्त शिवार कामाचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. 
बैठकीत माहिती देतांना जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय मुळे यांनी सांगितले कि, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत रब्बी पिक शेतात होती.
 
आता पिकांच्या काढणीला सुरूवात झाली असुन आता कामाची गती वाढेल. यावर्षी जिल्ह्यातुन १९२ गावांची निवड करण्यात आली असुन मोर्शी तालुक्यातील सर्वाधिक २८ तर तिवसा तालुक्यातील केवळ गावांची निवड करण्यात आली आहे. नवीन निवड झालेल्या गावाचे आराखडे बनवणे, अंदाजपत्रक तयार करणे या कामांना सुरुवात करावी असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकीला जलसंधारण, कृषी संबधित विभागाचे अधीकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
सौरपंपाकडे शेतकऱ्यांची पाठ :जलयुक्त शिवार योजनेच्या आढावा बैठकीनंतर पालकमंत्री पोटे यांनी विद्युत परिवहन विभागाचा आढावा घेतला. विद्युत विभागाच्या आढाव्यात जिल्ह्यात ८०० टान्सफार्मर असुन २०० दुरूस्तीला दिले आहेत. अचलपुर विभागात कमी दाबाची समस्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ‘सिंगल फेज’साठी लागणारा निधी लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल असे यावेळी पालकमंत्र्यानी सांगीतले.
 
 वाढत्या विज बीलासंबधी आता वरिष्ठ स्तरावरूनच दोषीविरुध्द कारवाई करण्याचे आदेश असल्याचे मुख्य अभिंयता सुहास रंगारी यांनी सांगीतले. सौरपंपसाठी १७०० पंपाचे जिल्हा उदिष्ट असुन फक्त १५२ व्यक्तींनी योजनेतील रकमेचा हिस्सा भरला ८५ व्यक्तींच्या शेतात सौरपंप बसवण्यात आले आहे. सौर पंपासाठी जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती मुख्य अभियंत्यांनी दिली. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...