आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 ते 23 एप्रिलपर्यंत साजरी होणार आंबेडकर जयंती, जयंती उत्सव पदाधिकाऱ्यांची पोलिस आयुक्तांसोबत बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - १३ एप्रिलच्या मध्यरात्री डाॅ. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करण्यासाठी जाताना तरुणांनी ट्रीपल सीट जाऊ नये. मिरवणुकीत दोन बेस आणि दोन साऊंड लावावेत. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. १३ ते २३ एप्रिल या कालावधीत उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा, असे आवाहन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाने घेतलेल्या बैठकीत करण्यात आले.
 
मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष सूरज साबळे, सचिव लखन भंडारे, माणिक अाठवले, राजरत्न इंगळे यांच्यासह राजा सरवदे, राजा इंगळे, सुबोध वाघमोडे, राहुल सरवदे, अॅड. संजीव सदाफुले अादी मान्यवर उपस्थित होते. शुक्रवारी सायंकाळी जुना एम्प्लाॅयमेंट चौकातील अांबेडकर प्रशालेत मंडळाची बैठक झाली. मिरवणुकीसाठी दोन तास वेळ वाढवून देण्यात अाल्याचे सांगितले. दरम्यान, या बैठकीआधी पोलिस अायुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या दालनात मान्यवर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. उत्सव शांततेत समन्वयाने करण्याबाबत चर्चा झाली.
बातम्या आणखी आहेत...