आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राळेरासच्या भुईत अवतरले आमीरच्या श्रमाचे आभाळ; ग्रामस्थांनी केले जोरदार स्वागत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी बुधवारी फाउंडेशनचा प्रमुख, बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी, प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक किरण राव यांनी राळेरास (ता. उत्तर सोलापूर) गावाला अचानक भेट दिली.
 
आमीरने गावकऱ्यांशी दिलखुलास संवाद साधताना किरण रावसोबत श्रमदानही केले. गेल्या अनेक दिवसांपासून कुदळ-फावडे घेऊन गावाला पाणीदार करण्यासाठी घाम गाळणाऱ्या ग्रामस्थांना आमीर आणि किरणच्या भेटीने मायेचा ओलावा आणि नवी ऊर्जाही दिली.
 
गावची नवी ओळख...
कार्यक्रमात दिनेश माने या तरुणाने मोजकेच मनोगत व्यक्त केले. याला नागरिकांनी प्रचंड टाळ्याच्या कडकडाटात दाद दिली. दिनेश माने म्हणाले, आम्ही राळेरास असे गावचे नाव सांगितले तर आम्हाला बार्शी तालुक्यातील का? असा प्रश्न विचारला जायचा. मात्र आता अामीर खान यांनी भेट दिल्यानंतर अभिमानाने आम्ही आमीर खानचे राळेरास असे उत्तर देऊ, असे स्पष्ट केले.
 
प्रत्येक गाव विजयी
पाणी फाउंडेशनची वॉटर कप स्पर्धा ही महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आहे. आपण पहाटे श्रमदान करून कामावर जाता आणि कामावरून येऊन पुन्हा रात्री श्रमदान करता. राज्यातील प्रथम आलेल्या गावाला बक्षीस दिले जाणार असले तर या स्पर्धेनंतर जे गाव पाणीदार होईल, दुष्काळमुक्त होईल ते प्रत्येक गाव विजयीच असेल.
- आमीर खान
 
प्रशिक्षणादरम्यान झालेली चर्चा आणि प्रत्यक्षात काम करण्यास केलेली सुरुवात याबद्दलचा अनुभव ऐकून घेतला. राळेरासचे रहिवासी भीमा डांगरे यांच्या घरासमोर शोषखड्डा मारला तर आणखी एका ठिकाणी पत्नीसह दगडगोट्यांनी खड्डा भरून घेतला. किरण राव यांनीही मनोगतामध्ये आनंद व्यक्त करीत सर्वजण एकत्र येऊन करीत असलेले श्रमदानाचे काम पाहिल्यानंतर नक्कीच महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार असल्याचे सांगितले. या वेळी पाणी फाउंडेशनचे समन्वयक डॉ. अविनाश पोळ, सुखदेव भोसले, ग्रामसेवक माधुरी सुरवसे यांनीही मनोगत व्यक्त केले.

ग्रामस्थांशी संवाद : जेमतेम २५० उंबरे असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील राळेरास गावात बुधवारी एक अजब उत्साह होता. गावाकडे येणाऱ्या रस्त्यांवर दिवसभर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनाही नेमके कोण येणार आहे, याची माहिती नव्हती. वरिष्ठांकडून एक मोठा अधिकारी कामाची पाहणी करण्यास येणार असेच सांगण्यात आले होते. मात्र सायंकाळी वाजता आमीर खान येणार असल्याचे कळाले. सायंकाळी वाजून ५० मिनिटांनी आमीर खान पत्नी किरण राव सोबत राळेरास गावी पोहोचले. गावकऱ्यांनी जोरदार टाळ्याच्या गजरात आमीर खानचे स्वागत केले. आमीर खान यांनी मास्टर ट्रेनर, सरपंच ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधला.
 
सरस्वतीचा वापर करा, लक्ष्मी आपोआप येईल
गावाचीआर्थिक परिस्थिती खूपच कठीण आहे. गावातील सर्वच तरुण शहरात इतर ठिकाणी मजुरीने काम करतात. यासाठी यंत्राने काम करण्यासाठी निधीची मागणी ग्रामसेविका सुरवसे यांनी केली. यावर आमीर खान यांनी आम्ही सरस्वती (ज्ञान) देतो, त्याचा वापर करून तुम्ही कामे करा. त्यातून आपोआप तुमच्याकडे लक्ष्मी येईल, असे स्पष्ट केले. यावर गावकऱ्यांनी बोला मिल के एक साथ, दुष्काळाचे दोन हात या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, कल सुबह पाच बजे आना...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...