आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांसाेबत अामिरचेही श्रमदान; ‘वॉटर कप’ स्पर्धेत सहभागी झालेल्या गावकऱ्यांना प्राेत्साहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत सहभागी झालेल्या गावकऱ्यांना प्राेत्साहन देण्यासाठी बाॅलीवूड अभिनेता अामिर खान व त्याची पत्नी किरण राव बुधवारपासून साेलापूर जिल्ह्यात अालेले अाहेत. गुरुवारी त्याने जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’चा मंत्र दिला. काही ठिकाणी गावकऱ्यांच्या श्रमदानात सहभागही घेतला. दुसरीकडे अामिर खानला पाहण्यासाठी ग्रामीण भागात गावकऱ्यांची माेठ्या प्रमाणावर धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून अाले. 
  
गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडी येथे अामिर खानचा नियाेजित कार्यक्रम हाेता, परंतु पावणेअकरा वाजले तरी अामिरचे दर्शन हाेत नसल्याने ग्रामस्थांची उत्सुकता  शिगेला पोहोचली होती. अखेर १०.५० वाजता ताे गावात अाला. कच्चा रस्ता पार करत, बांधावर चढून ताे एका टेकाडावर चढला. सुरक्षा रक्षकाचे कडे त्याच्याभाेवती हाेतेच. या ठिकाणी करण्यात आलेल्या एक हजार घनमीटरच्या खोदकामाची त्याने पाहणी केली. तसेच चरीमध्ये उतरत त्याने काही वेळ कामही केले. त्याच्यासोबत पत्नी किरण राव, उपक्रमाचे समन्वयक डॉ. अविनाश पोळ अादींची उपस्थिती हाेती. जमिनीचा स्तर पाहून चर पाडणारे हायड्रोमार्कर नामक यंत्र बाजारात ३ ते ४ हजार रुपयांना मिळते. परंतु येथील युवकांनी हे यंत्र अवघ्या २०० रुपयांत तयार केले. या युवकांचे अामिर खान व किरण राव यांनी ताेंड भरुन काैतुक केले. 

अापल्या गावासाठी करा श्रमदान  
यंदाच्या वाॅटर कप स्पर्धेत १३१५ गावांचा समावेश अाहे. स्पर्धेत हार-जित हाेतच असते. पण आपण हे काम आपल्या गावासाठी करतोय ही भावना ठेवा. आजचे हे काम उद्याच्या-पुढच्या पिढीसाठी आहे याचे भान ठेवा, सलाेखा जपा. तरच महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल. स्पर्धा केवळ ४५ दिवसांची असली तरी काम श्रमदानाने पूर्ण करा, पुढेही यात सातत्य ठेवा.    
- अामिर खान, प्रमुख ‘पाणी फाउंडेशन’

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...