आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४२ कोटींचा प्रस्ताव तातडीने स्थायीत, एकमताने मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केंद्रशासन पुरस्कृत अमृत योजनेतून शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी ७१.५२ कोटी रुपये मंजूर असून, त्यापैकी ४२.६४ कोटींच्या कामाचा मक्ता काढण्यात आला आहे. याबाबत सोमवारी मुंबईत उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्तांनी शनिवारी स्थायी समिती सभेत तातडीने प्रस्ताव दाखल केला आणि तातडीने एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी सायंकाळी सात वाजता त्या फाईलवर स्वाक्षरी करत प्रस्ताव तातडीने मुंबईस पाठवला.
पाकणी जलशुद्धीकरण केंद्रात काम करणे, पाकणी ते भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्र जलवाहिनी बदलणे, एअर व्हॉल्व्ह बसवणे, औज बंधारा दुरुस्ती, सोरेगाव आणि भवानी जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्ती, पाच टाक्या बांधणे, जुन्या टाक्यांची दुरुस्ती करणे, जलपुनर्भरण करणे, सौरऊर्जा संच बसवणे आदी कामे असलेला प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी तातडीने स्थायी समितीकडे सादर केला. या कामाचा मक्ता मे. इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेड, मिरज यांना देण्याचा प्रस्ताव होता. ४२.६४ कोटींचा मक्ता होता तर दोन टक्के जास्त दराने ८५.२८ लाख किंमत वाढली. त्यामुळे ४३.४९ कोटींचे काम झाले.

तातडीने दाखल मंजूर
महापालिका आयुक्तांनी तातडीने प्रस्ताव दाखल केला. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी स्थायी समितीत विरोधी पक्षाचे एकही सदस्य उपस्थित नव्हते. नगरसेवक आनंद चंदनशिवे उपस्थित होते. पण त्यांच्याकडे लेखी विरोध करण्यासाठी संख्याबळ नसल्याने त्यांनी चर्चा घडवली. अनावश्यक पाच कामे इतर ठिकाणी असताना यात समावेश कसा? असा प्रश्न उपस्थित केला.
स्थायी सभेत विरोधक नव्हते
४२ कोटींचा प्रस्ताव तातडीने दाखल करून एकमताने मंजूर केले. प्रस्ताव दाखल करून घेतल्याने त्यास विरोध करत भाजपचे तीन सदस्य निघून गेले. त्यामुळे स्थायी समितीत पक्षाचे विषय वगळता अन्य विषय एकमताने मंजूर केले. त्यात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विकास निधीतील कामे आहेत.

ही आहेत पाच कामे
सौर ऊर्जा पंप बसवणे, पाकणी येथे एनटीपीसी जोड, जलपुनर्भरण करणे, फ्लो मीटर बसवणे, जुन्या टाक्या दुरुस्ती ही अनावश्यक कामे घुसडल्याचा आक्षेप घेण्यात आला.

संख्याबळ नसल्याने विरोध नाही पण चर्चा केली
^लेखीविरोधकरण्यासाठी आमच्याकडे संख्याबळ नाही. पाण्याचा विषय होता. पण त्यास विरोध करण्यापेक्षा त्यावर चर्चा केली. अनावश्यक कामे आहेत, हे त्यांना निदर्शनास आणून दिले. तास चर्चा केली. आनंद चंदनशिवे, स्थायी समिती सदस्य
बातम्या आणखी आहेत...