आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढीव मानधनासाठी 800 अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर, उस्मानाबादेत जि. प. मुख्यालयावर धडक मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - समितीने शिफारसी केल्याप्रकरणी मानधनामध्ये वाढीसह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील ८०० अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी सोमवारी जिल्हा परिषद मुख्यालयावर मोर्चा काढला. प्रचंड घोषणाबाजी करत महिला बालकल्याण विभागसमोर चार तास धरणे आंदोलन करण्यात आले. 
 
महराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनिस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, उपाध्यक्षा कमल बांगर, प्रभावती गायकवाड यांच्या उपस्थितीत मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीपासून दुपारी एक वाजता मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेत आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर धरणे आंदोलनात झाले. २० जुलै २०१६ च्या शासननिर्णयानुसार वेतनवाढ समिती गठीत समितीने मानधनवाढीची शिफारस केली. त्यानुसार सीईओंना शिफारस करण्याची मागणी केली. मान्यता मिळाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत अंगणवाडी बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला. 
 

आंदोलनातील अन्य मागण्या 
- मिनीअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधनवाढीतील फरक अदा करण्यात यावा. 
- सेविका मदतनिसांना एक महिना द्यावी. 
- एक महिना अाजारी रजा मंजूर करण्यात यावी. 
- कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यासोबतच विमा योजना लागू करावी. 
 
मानधनापासून वंचित
अनेक अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अद्याप मानधन मिळाले नाही. त्रुटींची चाचपणी करून मानधनाची मागणी केली. 
 
 
बातम्या आणखी आहेत...