आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरांच्या किमती घसरल्या, दुभत्या जनावरांची कमी दरात विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - दुष्काळीस्थिती मुळे पोटच्या पोराबाळांप्रमाणे सांभाळलेली जनावरे नाईलाजाने विकण्याची वेळ पशुपालक शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे येथील कार्तिकी बाजारात जनावरांची संख्या वाढली आहे. मात्र, फारशी मागणी नाही. परिणामी जनावरांची किमतीच्या २५ टक्के किमतीत मागणी होत असल्याने जनावरे परत घेऊन जावी लागत आहेत. परंतु ती घेऊन जाऊन जगवायची कशी, हा प्रश्न त्यांना सतावत आहे.
येथील कार्तिकी यात्रेतील जनावरांच्या बाजारात जनावरे विक्रीस आणण्यात येतात. यात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने हा बाजार राज्यभर प्रसिद्ध आहे. यामध्ये गायी, म्हशी, खोंड, रेडा अशी २० हजारांहून अधिक जनावरे आली आहेत. यंदा कर्नाटकातून खिलार खोंडही मोठ्या प्रमाणावर आले आहेत. पंढरपूर म्हशींंना अधिक मागणी असते. त्यांच्या खरेदीसाठी मराठवाड्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे येथून शेतकरी येतात. मात्र, यंदा दुष्काळामुळे मागणी नसल्याने बाजारातील उलाढाल मंदावली आहे.

विहिरी, विंधन विहिरी, नद्या कोरड्या असल्याने चाऱ्याची पुरेशी उपलब्धता नाही. तुटवड्यामुळे पैसे देऊन वैरण मिळत नाही. पाच ताटांच्या कडबा पेंढीला २० रुपये मोजावे लागत आहेत. त्याचा परिणाम बाजारावर झाला आहे. पूर्वी एकादशी आधीपासून सौदे होत, मात्र यंदा त्यानंतर फारसे सौदे झाले नाहीत. साेमवारी बाजार संपणार असल्यामुळे पशुपालक जनावरे घरी नेण्याच्या बेतात आहेत.
घराकडेनेऊन काय करू : चारदिसवसांपासून बाजारात आहोत. मात्र, जनावरांना योग्य दाम मिळत नाही. गावात चारापाणी नाही. ती घराकडे परत नेऊन काय करायचे हे कळेना झाले, असे डोणजचे (ता. मंगळवेढा) उत्तम पाटील यांनी सांगितले. परदमोड करून बाजारात मुक्काम किती दिवस करायचा, घरच्या पोराबाळांचं काय करायचं? अशी चिंता हुलजंतीचे शेतकरी सतीश कदम यांनी लागली आहे.
७५ घोडे आले, फक्त

१० विकले
येथील घोडे बाजार हेही कार्तिकी यात्रेचे एक वैशिष्ट्य होते. मात्र, अकलूजच्या घोडेबाजारामुळे गेल्या तीन वर्षांपासून याला घरघर लागली. यंदा केवळ ७५ घोडे आले. त्यापैकी केवळ १० घोड्यांची विक्री झाली.

^गतवर्षी बाजार समितीच्या आवारात पाच हजार जनावरे होती. त्यातून चार ते पाच कोटींची उलाढाल झाली होती. यंंदा साडेसात हजार जनावरे आली आहेत. त्यातून अडीच कोटींपर्यंत उलाढाल होईल. यंदा जास्त जनावरे आली असली तरी दुष्काळामुळे मागणी किंमतही कमी आहे. बाजार समितीच्या बाहेरही जनावरांची खरेदी-विक्री होते. कुमारघोडके, सचिव, बाजार समिती, पंढरपूर