आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णांच्या जयंतीचा जल्लोष, लोकशाहीर साठे जयंती महोत्सवाची उत्साही सांगता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाची रविवारी मिरवणुकीने सांगता झाली. सामाजिक संदेश देणारे फलक, लेसर विद्युत रोषणाई, डॉल्बीच्या तालावर नृत्य करीत तरुणाई मिरवणुकीत सहभागी झाले होती. विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता.
भय्या चौक येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सायंकाळी प्रारंभ झाला. यंदाच्या मिरवणुकीत लेसर विद्युत रोषणाईने लक्ष वेधले. मिरवणुकीमध्ये भीमशाही मंडळाचे बग्गी, रथ, भगवान गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमा, एस. आर. मंडळ बग्गी, अण्णा भाऊ साठे पुतळा, लेसर शो, एस. एस. ग्रुपमध्ये कुर्डुवाडी ढोल पथक, संसद भवन, एकता मंडळात सर्व महान व्यक्तींच्या प्रतिमा, स्क्रिनद्वारे अण्णा भाऊ साठे यांचे विचार हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. भय्या चौक ते रामलाल चौक, पार्क चौक, सरस्वती चौक, पांजरापोळ चौक ते बुधवार पेठ मार्गे मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीतील डेसिबल मोजण्यासाठी सात यंत्र होते. मिरवणूक पाहण्यासाठी मार्गावर दुतर्फा गर्दी होती.

बग्गींचे आकर्षण
मिरवणुकीमध्ये मोठ्या मंडळांनी बग्गी आणली होती. काहींनी फुलांनी बग्गी सजवली होती तर काहींनी विद्युत रोषणाई केली होती. संपूर्ण मिरवणुकीमध्ये सुमारे नऊ बग्गी होत्या. याचबरोबर प्रत्येक मंडळांमध्ये सैराट चित्रपटाचे झिंग झिंग झिंगाट... या गीतावर तरुणाई देहभान विसरून नाचत होती.

कलावंतांना पाहण्यास गर्दी
‘येडंप्रेम’ चित्रपटातील अभिनेत्री साची शहा, भाग्यश्री साठे आणि अभिनेता प्रज्वल भोसले या कलाकारांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यांना पाहण्यासाठी समाजबांधवांनी एकच गर्दी केली होती.

या मंडळांचा होता सहभाग
पार्क चौकात क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनाच्या वतीने मिरवणुकीमध्ये सहभागी मंडळांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मिरवणुकीमध्ये समाधान मंडळ, मातंग एकता आंदोलन मंडळ, स्वराज्य मातंग प्रतिष्ठान, नवरंग मंडळ, एम. के. मंडळ, क्रांतिवीर लहुजी उस्ताद तरुण मंडळ, जय मातंग, कट्टा मांगवाडा, न्यू अण्णा भाऊ साठे मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, संघर्ष युवा संघटना, साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे संस्था, यू. के., ए.एस., साकेत, सी.एस., एन्जॉय फ्रेन्डस आदी अनेक मंडळांचा सहभाग होता.
बातम्या आणखी आहेत...