आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरपरिषदांची आरक्षण सोडत जाहीर, इच्छुक लागले तयारीला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - नगरपरिषदेच्या प्रभागांची रचना प्रसिद्ध करण्यात आली. २०११ च्या जनगणनेनुसार प्रभागरचना केली अाहे. दोन वॉर्डाचा एक असे १७ प्रभाग आहेत. यात एकूण ३४ जागा आहेत. शनिवारी (दि. २) प्रांताधिकारी संजय तेली, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली.
प्रभागनिहाय आरक्षण : एक नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण (महिला). दोन सर्वसाधारण, सर्वसाधारण (महिला). तीन अनुसूचित जमाती, सर्वसाधारण (महिला). चार : अनुसूचित जमाती (महिला), सर्वसाधारण. पाच : नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण (महिला). सहा नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण (महिला). सात अनुसूचित जाती, सर्वसाधारण (महिला). आठ अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण. नऊ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण. दहा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण. अकरा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण. बारा अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण. तेरा सर्वसाधारण, सर्वसाधारण (महिला). चौदा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण. पंधरा अनुसूचित जाती, सर्वसाधारण (महिला). सोळा नागरिकांचा मागास प्रवर्ग.
अक्कलकोटमध्ये सर्वसाधारण महिला सात जागा
जिल्ह्यातील नगरपालिकांच्या वर्षाखेरीस निवडणुका होणार आहेत. त्याची तयारी सुरू असून प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. तसेच शनिवारी सोडतीद्वारे प्रभाग आरक्षणही जाहीर करण्यात आले. अन्य प्रवर्गासाठी आरक्षण झाल्यामुळे अनेक इच्छुक नाराज झाले.
नगरपालिका प्रभाग रचना आरक्षण
करमाळा नगरपालिकेच्यासभागृहामध्ये शनिवारी प्रभाग रचना आरक्षणाची सोडत काढण्यात आली. माळशिरचे प्रांतािधकारी दादासाहेब कांबळे, मुख्याधिकारी डॉ. पंकज जावळे यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली.

प्रभाानिहाय आरक्षण : एक अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, दोन ओबीसी महिला, सर्वसाधारण, तीन सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, चार ओबीसी, सर्वसाधारण महिला, पाच ओबीसी, सर्वसाधारण महिला, सहा अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, सात ओबीसी महिला, सर्वसाधारण, आठ अनुसूचित जाती महिला, ओबीसी महिला, सर्वसाधारण.

आरक्षण सोडतीवेळी नगराध्यक्षा विद्या चिवटे, प्रशांत ढाळे, संजय सावंत, फारुक जमादार, राजश्री माने, नितीन घोलप, राहुल जगताप, प्रविण जाधव, डॉ. श्रीराम परदशी, दादाराम लोंढे, नरेंद्रसिंह ठाकूर, दादाराम लोंढे, श्रीनिवास कांबळे, अतुल फंड, दीपक सुपेकर यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कर्यकर्तेत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अक्कलकोट नगरपरिषदेचे११ प्रभाग वर्गात गेले असून, एकूण सदस्य संख्या २३ आहे. यापैकी १२ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यापैकी दोन अनुसूचित जाती, तीन ओबीसी सात सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी एक, ओबीसीसाठी तीन तर अनारक्षित सदस्य आहेत. सध्या नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. त्याची फेरसोडत लवकरच राज्यमंत्र्यांकडे होणार आहे. शनिवारी (दि. २) सकाळी ११ वाजता नगरपरिषद सभागृहात मुख्याधिकारी प्रसाद काटकर, निरीक्षक, प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे, तहसीलदार अंजली मरोड, मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या उपस्थिती सोडत काढण्यात आली.

शहराची लोकसंख्या ४० हजार असून, ३३३७५ मतदार आहेत. १० सप्टेंबर २०१६ च्या विधानसभा मतदार यादीप्रमाणे मतदान करण्याची संधी मिळणार आहे. वाॅर्ड पद्धत ही उत्तरेकडून दक्षिणेकडे असा अाहे. नैसर्गिक सलगता लक्षात घेताना दहा टक्के लोकसंख्या कमी-जास्त होऊ शकते, असे काटकर म्हणाले.
अक्कलकोटमध्ये सर्वसाधारण महिला सात जागा
बातम्या आणखी आहेत...