आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरला जोडणारा आणखी एक रस्ता होणार आता चौपदरी, सोलापूर-अक्कलकोट रस्सात्‍याठी निविदा प्रसिद्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर शहराला जोडणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करून तीर्थक्षेत्र जोडून घेणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २६ मार्च २०१६ रोजी सोलापूर येथे केली होती. त्यानुसार सोलापूर ते अक्कलकोट हा मार्ग आता चौपदरी होणार आहे. या कामाचे ऑनलाइन टेंडर प्रसिद्ध झाले आहे. याकरिता पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पाठपुरावा केला होता. 

 

सोलापूर - अक्कलकोट हा ३८.९ किलोमीटरचा रस्ता आहे. चौपदरीकरणासाठी ६९० कोटी ४२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. निविदा भरण्यासाठी ३० नोव्हेंबर २०१७ ते १५ जानेवारी २०१८ ही कालावधी देण्यात आली आहे. १६ जानेवारी रोजी टेंडर खुले करण्यात येणार आहे. टेंडर निश्चित झाल्यानंतर मक्तेदारास काम सुरू करण्यासाठी चार ते सहा महिन्यांचा कालावधी दिला जातो. यानंतर काम पूर्ण करण्यासाठी ३० महिन्यांची मुदत असते. या महामार्गावर वळसंग येथे टोल नाका वळसंग असणार आहे.


२६.४५ किमी सर्व्हिस रस्ते 
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर ते गाणगापूर हा मार्ग चार पदरी करण्याची घोषणा केली होती. रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी दळणवळण सुधारण्यासाठी केंद्र सरकारने सर्व शहरे चार पदरी रस्त्याने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार सोलापूर शहर पुणे आणि हैदराबाद जोडले जात आहे. सोलापूर ते येडशी हे काम होत आले आहे. सोलापूर-विजापूरचे टेंडर निश्चित झाले आहे. सोलापूर ते कोल्हापूर कामाला मंजुरी मिळाली आहे. सोलापूर-सिन्नूरला मंजुरी मिळाली असून अक्कलकोट ते सिन्नूर (महाराष्ट्र-कर्नाटक सीमा) दुपदरीकरणाचे काम सुरू आहे तर आता सोलापूर-अक्कलकोट चौपदरीकरणाला सुरुवात होत आहे. 

 

तीर्थस्थळे असे जुळणार 
अक्कलकोट - मैंदर्गी, दुधनी, सिन्नूर मार्गाचे दुपदरीकरण होत आहे. सिन्नूर ते अफजलपूर आणि पुढे कलबुर्गीपर्यंतच्या मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. अफजलपूरनंतर मुख्य मार्गापासून सात किलोमीटरवर गाणगापूर हे तीर्थस्थान आहे. या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे सोलापूर ते अक्कलकोट आणि गाणगापूर ही दोन तीर्थस्थळे जोडली जाणार आहेत. ही कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून होत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...