आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षेची एक उत्तरपत्रिका झाली गहाळ, जिल्हाधिकाऱ्यांना मागितला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील २२ केंद्रावर २९ जानेवारी रोजी विक्रीकर निरीक्षक पदासाठी पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती. मात्र यामध्ये एक उत्तरपत्रिका कमी मिळाल्याने याचा जिल्हाधिकारी कार्यालयाने खुलासा करावा, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधित परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व समवेक्षक यांना खुलासा करण्याबाबत नोटीस बजावली आहे. २०१५ मध्ये उत्तरपत्रिका गहाळ झाल्याने एकास आयोगाने शिक्षा दिली आहे.
 
राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने २९ जानेवारी २०१७ रोजी विक्रीकर निरीक्षक पदासाठी पूर्वपरीक्षा घेतली होती. परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका आयोगाकडे पाठविण्यात आल्या. मात्र यामध्ये एक उत्तरपत्रिका कमी आली आहे. याबाबत चौकशी करून तातडीने अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आल्या आहेत. यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने दयानंद काशिनाथ अासावा परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक, समवेक्षक व केंद्रप्रमुख यांना नोटीस बजावली आहे. यांचा खुलासा घेऊन त्यावर जिल्हाधिकारी आयोगास म्हणणे सादर करणार आहे.
 
यापूर्वीच्या घटनेत विभागीय चौकशीची शिक्षा : सन २०१५ मध्ये विक्रीकर निरीक्षक पदासाठी झालेल्या परीक्षेत बेगम कमरूनिस्सा परीक्षा केंद्रावरून आयोगास एक उत्तरपत्रिका कमी मिळाली होती. याप्रकरणी चौकशी होऊन केंद्रप्रमुख शासकीय तंत्रनिकेतनचे सहायक प्राध्यापक कप्पीकेरी यांची चौकशी करण्यात आली. आयोगाने त्यांना याप्रकरणी दोषी धरून त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रा. कप्पीकेरी यांची चौकशी सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...