आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवघ्या ३५ व्या वर्षी कोरे बनले कृषी समिती सभापती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना मॉडेलिंग करणारा युवक गावच्या विकासासाठी निवडणूक लढवून वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी सरपंच झाला, त्यानंतर कामाच्या जोरावर जिल्हा परिषदेच्या कृषी पशुसंवर्धन समिती सभापती झाला. दिग्गजांना मागे सारत नूतन सभापती अप्पाराव कोरे यांनी मिळवलेले यश युवकांना प्रेरक ठरणारे आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी पशुसंवर्धन समितीच्या सभापतीपदाची निवड शनिवारी झाली. (कै.) पंडीत वाघ यांचे दीड महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाल्याने त्यांच्या रिक्तपदी श्री. कोरे यांची निवड झाली. त्या निमित्ताने दक्षिण सोलापूर तालुक्यास पाचव्यांदा कृषी पशुसंवर्धन समिती सभापतीपदाची संधी मिळाली.

सभापतीपदासाठी काही इच्छुकांनी गॉडफादर मार्फेत जाेरदार हालचाली सुरु केल्या. शनिवारी सकाळी रंगभवन येथील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींची बैठक झाली. सदस्य सुरेश हसापूरे यांच्या नावाची गेल्या दोन दिवसंपासून चर्चा सुरु होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके, निरीक्षक प्रदीप गारटकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, रश्मी बागल आमदार बबनराव शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, पक्षनेते धैर्यशील मोहिते यांची बैठक झाली.
साडेबारा वाजात श्री. पाटील यांनी सभापतीपदासाठी श्री. कोरेंच्या नावाची घोषणा केली. त्यांच्या अर्जावर सुचक म्हणून सूचक म्हणून सुभाष गुळवे शिवाजी कांबळे यांनी सूचक- अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. सभापतीपदासाठी श्री. कोरेंचा एकच अर्ज राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सतीश धुमाळ यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. कोरेंच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाी अन्् गुलालाची उधळन करी जल्लोष केला.

साळुंकेंनी मिळवला काँग्रेसचा पाठिंबा
जिल्हाध्यक्षदीपक साळुंके यांनी निवडीच्या बैठकीपूर्वी थेट काँग्रेसभवन गाठले. आमदार सिद्धराम म्हेत्रे, भारत भालके, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार दिलीप माने काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांसमवेत बैठक घेऊन त्यांचा पाठिंबा मिळवला. त्यानंतर थेट रंगभवन येथील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक घेऊन कोरेंच्या नावाची
घोषणा केली. दरम्यान, कुसूम बगाडे यांनीही कोरेंच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, साळुकेंनी शिष्टाई करुन बगाडेंचा अर्ज मागे घेतला.

सुरेश हसापूरे यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार बाळासाहेब शेळके यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. पक्षाचे कार्यकर्ते सदस्यांच्या विरोधात केलेल्या कुरघोड्या, अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन स्वत:ची कामे मार्गी लावणे, सातत्याने नव-नवीन गटाशी असणारी जवळीक आगामी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हसापरेंना संधी मिळण्यात राजकीय खलबतं झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात रंगली होती.

मंद्रूपमध्ये दोन सभापती
दक्षिणसोलापूर तालुक्यातील मंद्रूप हे सर्वात मोठे गाव आहे. दक्षिण पंचायत पंचायत समितीचे सभापती गुरुनाथ म्हेत्रे हे मंद्रूपचे आहेत. कृषी सभापतीपदाची संधी कोरेंना मिळाल्याने मंद्रूपला दोन सभापती मिळालेत. तसेच, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण देशपांडे पिरप्पा म्हेत्रे मंद्रूपचे असून तालुक्याचे सत्ताकेंद्र मंद्रूपकडे सरकल्याचे चित्र आहे.

दोनदा मंद्रूपचे सरपंच
नूतनसभापती कोरे सन २००४ ते २००५ सन २००७-०९ या कालावधीत दोनदा सरपंचपद भूषविले. अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असणाऱ्या कोरेंनी दोन मराठी चित्रपटांमध्ये छोट्याशा भूमिका केल्या होत्या. मितभाषी असणारे कोरेंनी मंद्रूप परिसरात गेल्या आठ वर्षांमध्ये रक्तदानाची मोठी चळवळ राबविली आहे. तसेच, वृक्षलागवड अभियानच्या माध्यमातून मंद्रूप जिल्हा परिषद मतदारसंघात एक लाख झाडं लावली असून त्यांचे चांगले संवर्धन केले आहे. कमी वयात सभापतीपदीची संधी मिळवणारे कोरे हे गेल्या काही वर्षांतील एकमेव सदस्य आहेत.

सर्वांना सोबत घेऊन काम
^पंडीतवाघ यांचे शेतकरी विकासाची स्वप्नपूर्ती करणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी अन्् पशुपालकांना केंद्रस्थानी ठेवून विकासकामे करण्यात येतील. सर्वांना सोबत घेऊन विकास करण्यास प्राधान्य आहे.” अप्पाराव कोरे, कृषी पशुसंवर्धन सभापती
बातम्या आणखी आहेत...