सोलापूर - सोलापूर शहरातील वैभवशाली व्यक्तिमत्त्व म्हणून आेळखल्या जाणाऱ्या अप्पासाहेब वारद यांच्या जीवनचा वेध घेणाऱ्या दि एक्झम्पलरी लाइफ ऑफ पुण्यश्लोक अप्पासाहेब वारद या इंग्रजी चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र वीरशैव सभेच्या वतीने होणार असल्याचे नरेंद्र गंभीरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शुक्रवारी १७ जून रोजी निर्मलकुमार फडकुले सभागृहात सायंकाळी वाजता सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी असतील. यावेळी महाराष्ट्र वीरशैव सभेचे माजी प्रांतिक अध्यक्ष डॉ. शिवमूर्ती शाहीर, माजी गृहराज्यमंत्री आमदार सिद्धाराम म्हेत्रे, वळसंग सूत गिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकाेते महाराष्ट्र वीरशैव सभेचे कार्याध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके उपस्थिती असतील.
टिळकांच्या मैत्रीचे आहे सुंदर वर्णन
यापुस्तकात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अप्पासाहेब वारद यांच्या मैत्रीचे वर्णन केले आहे. त्यात टिळक आणि त्यांच्या मैत्रीचे प्रसंग, त्यांच्यात होत असेलल्या चर्चेचे वर्णन, टिळक सोलापूरला आले असता अप्पासाहेबांच्या घरी मुक्काम केल्याचे वर्णन करण्यात आले आहे.
नातू, पतवंडांचे आग्रहाने झाले लिखाण
वारदयांचे विविध क्षेत्रात अजोड काम आहे. पूर्वजांच्या महान कार्याचा लिखित स्वरूपात संचय असण्यासाठी त्यांच्या वारसांनी सिद्धेश्वर प्रशालेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला शीलवंत यांना बामणीकर यांच्या पुस्तकाचा विविध प्रकारच्या पूर्वीच्या साहित्याचा वापर करून लिखाण करण्यास सांगितले. शीलवंत यांनी वारद अप्पा कसे होते, त्यांचे कार्य कसे व्यापक होते याचा एक वर्ष अभ्यास केला आहे.