आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरबी समुद्रातील शिवस्मारकात असेल तुळजाभवानी मंदिर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कला दिग्दर्शक देसाई यांनी तुळजाभवानी मातेचे पूजन करून दर्शन घेतले. - Divya Marathi
कला दिग्दर्शक देसाई यांनी तुळजाभवानी मातेचे पूजन करून दर्शन घेतले.
तुळजापूर : छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे प्रवेशद्वार तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वाराची प्रतिकृती असणार आहे. शिवस्मारकाच्या केंद्रस्थानी कुलस्वामिनी तुळजा भवानीचे मंदिर हुबेहूब साकारण्यात येणार असून मंदिरासभोवताली शिवरायांच्या जीवनातील प्रसंगांचा पट साकारण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी रविवारी (दि.१) तुळजापूर येथे दिली. 
नितीन देसाई यांनी नववर्षदिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर कार्यालयात ते बोलत होते. देसाई म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे प्रवेशद्वार तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वाराची प्रतिकृती असेल. छत्रपतींची कुलदेवता, स्फूर्तिस्थान आई तुळजाभवानी माता मंदिरासभोवती शिवरायांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत महत्त्वाच्या प्रसंगांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांचा स्वराज्य निर्मितील संघर्ष शिल्पकृतीद्वारे दाखवण्यात येणार 
 
 
बातम्या आणखी आहेत...