आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गवंड्याने मुलांना कष्टातून केले स्थापत्य अभियंता नि फौजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाल दुर्गुळे, गोकुळ दुर्गुळे - Divya Marathi
विशाल दुर्गुळे, गोकुळ दुर्गुळे
करमाळा- मेहनतीचे काम करून, घाम गाळून काबाडकष्ट करून कुटुंब चालवून आपली उपजीविका भागवून जगणं यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. समाजात अशी अनेक कुटुंबं आहेत. मुलाबाळांचे लग्न तसेच भविष्याबाबत अंधार अशा रीतीने सगळं अंधारमय जगणं अनेकांच्या नशिबी असतं. तरीही काबाडकष्ट करून त्यामधून आपलं कुटुंब आपल्या मुलांचं करिअर घडवलं तर दिवस बदलायला काही वेळ लागत नाही. याबाबत रोशेवाडी (ता. करमाळा) येथील पदवीधऱ असूनही गवंडी काम करणारे संजय दुर्गुळे यांची अशीच प्रेरणादायी कहाणी आहे. 

संजय दुर्गुळे यांची परिस्थिती हलाखीचीच. आई-वडील मोलमजुरी करायचे. त्यातून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परंतु घरातील नाजूक परिस्थीने पुढचे शिक्षण झाले नाही. लग्नानंतरही गवंडी कौशल्य प्राप्त केले. कठोर मेहनत करून त्यांनी कुटुंबीयांची उपजीविका तर भागवलीच परंतु दोन मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन त्यांना सन्मानाने उभा राहण्याची दिशा दिली. गोकुळ नावाचा मुलगा सिव्हिल इंजिनिअर झाला आणि विशाल हा मुलगा आर्मीत सेवा करत आहे. सध्या तो बडोदा (गुजरात) येथे कार्यरत आहे. संजय यांची पत्नी छाया याही शेताची कामे करतात. आपण कष्ट सोसले तरी आपल्या मुलांवर ही वेळ येऊ द्यायची नाही. पै-पै जमा करून शिक्षणामध्ये कोणताही अडथळा येऊ द्यायचा नाही. असा निर्धार दुर्गुळे दापत्याने केला. संतोष अडाणे यांनी यांनी शैक्षणिक शुल्कासाठी मदत केली. 

संजय यांचा स्वभाव मुळात सेवाभावी वृत्तीचा. गवंडी काम करतानाही प्राधान्याने गोर-गरिबांची छोटी-मोठी डागडुजीची कामे अल्पदरात करणे, गरिबांच्या काही मुलांना शिक्षणाच्या फी मध्ये अडचणी आल्या तर स्वत: मित्र परिवाराचे सहकार्य घेऊन मदत करतात. मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी आजही दुर्गुळे दापत्य कामामध्ये व्यस्त असतात. 

गोकुळ आणि विशालचे आई-बाबा म्हणाले... 
कुटुंबामध्येपती-पत्नीहे संसाराची दोन चाकं आहेत. माझ्या पतींच्या विचारांना मी कधीही विरोध केला नाही. त्यांनी लहानपणापासूनच मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. माझीही सहकार्याची भावना होती. यामुळे खस्ता खाऊन आमची मुलं घडली. याचा मला अभिमान वाटतो. 
- छाया दुर्गुळे, रोशेवाडी, ता. करमाळा 

आम्हीआमच्यामुलांचे शिक्षण अत्यंत हालाखीत कष्टाने शिकवून पूर्ण केले. हे करीत असताना पत्नीचे सहकार्य मिळाले. त्याचबरोबर अनेक मित्रांनी सहकार्य केले. आता इतर मुलांना मी जरी पूर्ण मदत करू शकलो नाही तरी खारीचा वाटा म्हणून मदत करण्याची माझी भावना आहे. त्यासाठी मी आता प्रयत्नशील आहे. 
- संजय दुर्गुळे, रोशेवाडी, ता. करमाळा 
बातम्या आणखी आहेत...