आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरिया विरुद्ध फिरदोस पटेल, नगरसेवक पदाचा राजीनामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अॅड. उमरखान बेरिया आणि नगरसेविका फिरदाेस पटेल यांच्यातील अंतर्गत राजकारण विकोपाला गेले आहे. आॅफिसर क्लबसमोरील बागेच्या मुद्द्यावरून नगरसेविका पटेल यांनी पक्षाकडे नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. बेरिया हे विकास कामात आडकाठी आणत असल्याचे पटेल यांचे म्हणणे असून बेरिया यांनी त्याचे खंडन केले. विकासकामात अडथळा आणलेला नाही, असे बेरिया म्हणाले.
नगरसेवक बेरिया पटेल यांच्यात राजकीय वाद आहे. त्याचे पडसाद पक्षाच्या बैठकीत उमटले होते. पटेल यांच्या प्रभागात मनपाची बाग अाहे. ती शिवरत्न सामाजिक संस्थेस दिली. या बागेमुळे पटेल आणि बेरिया यांच्यात वाद निर्माण झाला आहे. याबाबत पक्षाकडे आमदार प्रणिती शिंदे यांना माहिती देण्यात आली. या बागेचे नूतनीकरण करून आमदार शिंदे यांच्या हस्ते उद््घाटन केले होते.

आॅफिसर क्लबसमोरील बागेत बेकायदा बांधकाम केल्याची तक्रार आल्याने त्यासंबंधात महापालिकेच्या वतीने फायली फिरू लागल्या. त्यामुळे विकासकामात अडथळा आणत असल्याचे कारण पुढे करत नगरसेविका पटेल यांनी मंगळवारी पक्षाकडे नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शहराध्यक्ष सुधीर खररटमल यांनी शिष्टाई करत प्रकरणावर तूर्त पडदा टाकला.
शहराध्यक्ष खरटमल यांच्याविरुद्ध ब्लाॅक अध्यक्ष झाले आक्रमक
सोलापूर - काँग्रेस शहराध्यक्षांच्या विरोधात पक्षनिरीक्षकांकडे तक्रार करणे, प्रसार माध्यमांच्या समोर घटनेचा वृत्तांत देऊन पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी चार ब्लॉक अध्यक्षांकडून माफीनामा मागवण्यात आल्याने शहर काँग्रेसमधील वाद आणखीनच चिघळला आहे. माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे घेतील तोच निर्णय आम्हाला मान्य आहे, असे ब्लॉक अध्यक्ष माजी उपमहापौर माणिकसिंग मैनावाले यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी (दि.३) पक्षनिरीक्षक मोहन जोशी यांच्यासमवेत आयोजिली होती. त्यावेळी व्यासपीठावर पदाधिकारी नगरसेवकांची मोठी गर्दी होती. त्याच दरम्यान दोन नगरसेविका बैठकीच्या ठिकाणी आल्याने शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी ‘ए’ब्लॉक अध्यक्ष जाबीर अल्लोळी, ‘बी’ ब्लॉक अध्यक्ष माणिकसिंग मैनावाले, ‘सी’ ब्लॉक अध्यक्ष प्रा. संजय बनसोडे, ‘डी’ ब्लॉक अध्यक्ष डॉ. सायबू गायकवाड या चौघांना अपमानास्पद बोलून व्यासपीठावरून हाकलून दिले. त्यामुळे संतापलेल्या चारही ब्लाॅक अध्यक्षांनी थेट माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली.
तसेच, माध्यमांना ते प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले. त्या घटनेचे पडसाद गुरुवारी (दि.४) पक्षनिरीक्षक मोहन जोशी यांच्या समवेत आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पुन्हा उमटले. निरीक्षक जोशी यांनी बुधवारी झालेल्या घटनेबाबत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. तसेच, शहराध्यक्षांच्या विरोधात लेखी तक्रार केल्याप्रकरणी त्या चौघांनी लेखी माफीनामा देऊन प्रकरणावर पडदा टाकावा, अशी सूचना केली.

माध्यमांशी बोलताना मैनावाले म्हणाले, “ब्लॉक अध्यक्षांना अपमानास्पद वागणूक मिळाली असून शहराध्यक्षांच्या मनमानी कार्यपद्धतीस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते वैतागले असून आम्ही फक्त पुढाकार घेतला आहे. पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कार्यरत असून पदासाठी काम करणारे आम्ही नाहीत. पक्षाचा प्रोटोकॉल अन्् शिस्त याबाबत शहराध्यक्षांना अभ्यासाची जास्त गरज असून आम्ही माफीनामा देणार नसून थेट शिंदेसाहेबांच्या समोर होईल तोच निर्णय आम्हाला मान्य, असे मैनावाले यांनी सांगितले.

शेवटचा पर्याय म्हणून राजीनामा दिला
^त्यापरिसरातीलनागरिकांना शुद्ध हवा मिळावी आणि महिलांंना व्यायाम करता यावा यासाठी आम्ही बागेत अनेक सुविधा उपलब्ध केल्या. त्या बागेशी माझा संबंध नाही. पण माझ्या प्रभागात असल्याने मी हस्तक्षेप केला. वारंवार होणाऱ्या त्रासाची माहिती पक्षाकडे सादर केली. शेवटचा पर्याय म्हणून मी पक्षाकडे नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. '' फिरदोसपटेल, नगरसेविका

मनपानियमानुसार काम करत असेल, मी काय करू
^त्याबागेशीनगरसेविकेचा काय संबंध? त्या बागेस विरोध करण्यासाठी मी एकही पत्र महापालिका अधिकाऱ्यांना दिले नाही. तेथील खोकेधारकांना त्रास हाेत असल्याने ते माझ्याकडे आले. मी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. महापालिका प्रशासन नियमानुसार काम करत असेल तर मी काय करणार. शहराध्यक्षांनी फोन केला. माहिती विचारली. ती मी दिली.'' अॅड.उमरखान बेरिया, नगरसेवक

ब्लाॅक अध्यक्षांचे आरोप खोटे
^महापालिकानिवडणुकीच्यानिमित्ताने पक्षनिरीक्षक मोहन जोशी यांनी काही निवडक पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. बुधवारी घडलेल्या प्रकरणाबाबत पक्षनिरीक्षकांनी ब्लॉक अध्यक्षांना दिलेल्या आदेशाबाबत मला माहिती नाही. पुढील आठवड्यात निरीक्षक जोशी सोलापुरात येणार असून त्यावेळीच चर्चा होईल. त्या ब्लॉक अध्यक्षांचे सर्व आरोप खोटे असून त्यांना अद्याप वॉर्ड अध्यक्ष नेमता आला नाही, हे वास्तव आहे.'' सुधीर खरटमल, शहराध्यक्ष, काँग्रेस
बातम्या आणखी आहेत...