आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडी संशयितांना अटक, चार तोळे दागिने जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बंदघरे हेरून चोरी करणारा नागनाथ ऊर्फ गणेश महताब काळे (वय २३, रा. पारधी कॅम्प, कुंभारी) त्याचा भाऊ शिवराज या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मार्केट यार्डजवळ करण्यात अाली. नागनाथ त्याचा भाऊ शिवराज हे दोघेजण बंद घरे दिवसा हेरून रात्री चोरी करण्यात पटाईत अाहेत.
जोडभावी हद्दीत तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली अाहे. चार तोळे दागिने जप्त करण्यात अाले अाहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक शंकर जिरगे, सहायक निरीक्षक रणजित माने, हवालदार सूरज मुलाणी, विनायक सोनार, रवी परबत, सुरेश जमादार, विनायक बर्डे, अशोक लोखंडे, अौदुंबर अाटुळे, शांतीसागर कांबळे या पथकाने केली.
बातम्या आणखी आहेत...