आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच घेताना पालिकेचा शिपाई बाबरे रंगेहाथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- खुलीजागा मिळवून देण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना महापालिकेच्या भूमी मालमत्ता विभागातील शिपाई राहुल काशिनाथ बाबरे (वय ४९) यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगहाथ पकडले.
ही कारवाई गुरुवारी रात्री व्हीअायपी रोडवरील तनिष्का ज्वेलर्सच्या गल्लीत करण्यात आली. यावेळी लाचलुचपत विभागाने संशयित आरोपीला सदर बझार पोलिसांच्या स्वाधीन केले. विष्णुदेवा बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या अध्यक्षांनी तक्रार दिली होती. महापालिकेने संस्थेला ठराव करून सिटी सर्व्हे नं. ६०८ /२ उत्कर्षनगर, विजापूर रस्ता परिसरातील खुली जागा ३० बाय ४० चौरस फूटची जागा मंजूर केली होती. २९ वर्षे ११ महिने मुदतीच्या कराराप्रमाणे देण्याचे ठरविले होते. मात्र ती जागा अद्याप संस्थेस मिळाली नव्हती. आरोपी राहुल बाबरे हा स्वत:च्या जबाबदारीवर संस्थेस त्या जागेचा ताबा देतो म्हणून तक्रारदारास सांगितले. मात्र त्यासाठी त्यांनी हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.