आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिव -गणांचा प्रमुख असणारा गणेश प्राचीनत्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व देवतांमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या गणपतीचे प्राचीनत्व वाङ््मयात आढळते. वेदांचा आणि उपनिषदांचा प्रारंभ गणेशस्तवनाने होत असला तरी ऋग्वेदाचा गणांना त्वा गणपतिम् हा मंत्र गणेशाकरिता आहे. गणपतीचा स्पष्ट उल्लेख मैत्रायणी संहितेतील गणेश गायत्री आणि गणपत्यर्थवशीर्षात मिळतो. शिव-पार्वतीचा हा मुलगा शिव-गणांचा प्रमुख होता, म्हणून त्यास गणपती म्हणतात. गणेश उपासनेची सुरुवात अंदाजे इसवीसन पूर्व हजार वर्षापूर्वी झाली असावी. वाङ््मयात गणपती प्राचीन काळापासून आहे, पण प्रत्यक्ष मूर्ती स्वरूपात तो त्या मानाने फार नंतरच्या काळी प्रवेशला. गणपतीची प्रतिमा यक्ष प्रतिमेशी मिळती-जुळती आहे. (आखूड बांधा, सुटलेले पोट), यक्ष प्रतिमेची मुखे माणसाची, बैलाची किंवा हत्तीची असतात. शुंग, कुषाण काळातील मथुरा अमरावती येथे हत्तीचे मुख आणि मानवाचे शरीर असलेल्या प्रतिमा सापडल्या आहेत. या सर्वात प्राचीन ठराव्यात म्हणजे अंदाजे इसवीसन पूर्व पहिले शतक. हे गज-मुख यक्ष होत. त्यानंतर उत्तरप्रदेशातील संकीया येथील उभी व्दिभूज गणेशमूर्ती आणि मथुरा येथे असलेल्या मूर्ती सर्वात प्राचीन ठराव्यात. यानंतर मध्य प्रदेशातील उदयगिरी, अहीच्छत्र, भीतरगाव, राजघाट (सर्व उत्तरप्रदेश) येथील गुप्त राजवटीतील आहेत. इसवीसन चौथे ते सहावे शतकातील या प्राचीन गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला मुगुटादी अलंकार नाहीत. तसेच त्याचे वाहन उंदीरही नाही. या मूर्ती चार हातांच्या डाव्या सोंडेच्या आहेत. गुप्त काळापासून गणेश प्रतिमांची उपासना वाढली. तसेच नंतर चालुक्य, राष्ट्र कुट यादवांच्या काळातही गणेश उपासनेचे प्रमाण वाढतच गेले. लक्षण ग्रंथामध्ये चर्तु, अष्ट, दश अष्ट भुज वगैरे अनेक रुपात वर्णन केले आहे. बृहद्संहीतेचा उल्लेख जुना आहे. तेथे परशू आणि मूळा ही गणपतीची आयुधे सांगितली आहेत. संकीसा मथुरा येथील प्रतिमा ठिपकेदार लाल दगडाच्या आहेत. या सर्व प्रतिमा इसवीसनाच्या तिसऱ्या चौथ्या शतकातील आहेत. गुप्तकाळापर्यंतच्या प्रतिमा बसलेले किंवा उभे आहेत. नृत्य गणपती हा त्यानंतरचा प्रकार वाटतो. तसेच विघ्नेश्वर, शक्ती गणेश, महागणपती, पंचमुख गणेश, यक्ष विनायक, राक्षसारुढ, अाम्रलुंबी म्हणजे अांब्याची डहाळी घेतलेला अशा रुपात गणेश प्रतिमा मिळाल्या आहेत. यावरून त्याचे मूर्ती विविध ग्रंथामधील उल्लेखांचे प्राचीनत्व दिसून येते.

शब्दांकन: रामेश्वर विभूते
बातम्या आणखी आहेत...