आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचे चक्र केले गतिमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कुंभोज या गावी झाला. आज त्यांची जयंती. त्या निमित्ताने ....

रयत संस्था म्हटलं की, डोळ्यासमोर येतात ते पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनाच सारेजण अण्णा या नावाने संबोधत होते. आण्णांनी संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी रयत संस्था स्थापन करून गरीब, दीनदलित, उपेक्षित वंचितांकरिता शिक्षणाची सोय तर केलीच. पण त्यांनी विद्यार्थी विद्यार्थिनीकरिता खाण्याची राहण्याची सोय केली अर्थात वसतिगृह निर्माण केले. त्यांच्या पहिल्या वसाहतिगृहाचे नाव छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग हाऊस असे होते. विद्यालय, महाविद्यालय आणि वसतिगृहाची सोय करून विशेषत: ग्रामीण भागातून शिक्षणाकरिता आलेल्या मुला-मुलींची सोय केली. अस्पृश्यांची मुलं आणि उच्चवर्णीयांच्या मुलांनी एकत्र राहण्याची सोय व्हावी, हा हेतू ठेवून सर्वधर्मीयांची जातीपंथाची मुले एकत्र राहावीत आणि त्यामुळे जातीयता नष्ट होईल. जातीयतेच्या भिंती मोडून काढण्यासाठी नेस्तनाबूत करण्यासाठी अथक प्रयत्न करून अद्वितीय कार्य डॉ. भाऊराव पाटील यांनी केले. शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे एकमेव प्रभावी साधन आहे ते तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचले पाहिजे. शिक्षणांनी माणूस घडतो, हीच त्यांची धारणा होती.

भाऊराव पाटील यांनी खेडोपडी जाऊन फार फार भ्रमंती केली. ज्यांचा जेवढा अधिक प्रवास तेवढे त्यांचे ज्ञान अफाट या उक्तीनुसार अण्णांचे ज्ञान तर होतेच. फक्त सातवी पास झालेले अण्णा जगाच्या विशाल शाळेत महर्षी ठरले. भरपूर भटकंती केल्यामुळे खेड्यातील दारिद्र्य, अज्ञान भाऊरावांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यासाठी त्यांनी शिक्षणसंस्था निर्माण करण्याचा जणू ध्यासच घेतला. अण्णांचा स्वभाव सरळ, निर्भयी, कणकर आणि नि:स्वार्थी संयमी होता. त्यांचा पेहरावा जाडंभरडं धोतर, साधा शर्ट नि खांद्यावर एक पंचा, साधी राहणी उच्च विचारसरणी कर्मवीर भाऊरावांची होती. कुशल नेतृत्व होते. ढोंगीपणा, लबाडी, अहंपणा नव्हता. त्यामुळे सामाजिक सेवेची आवड असणारी मंडळी आपोआप त्यांच्याकडे आकर्षित होत असत. शिक्षणरूपी संसाराचा गाडा योग्य दिशेने नेण्याचे कार्य भाऊराव पाटील यांनी केले.

आदर्शाचा पाया रचिला
अंधश्रद्धेला,अज्ञानाला दूर सारूनी जातीयतेच्या किंवा संकुचित वादाच्या चौकटी मोडून टाकण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करून समता, सहजीवन आणि मानवता या त्रिसूत्री श्रेष्ठ आणि मौल्यवान आदर्शाचा पाया रचिला. शिक्षणाने समाजाचा विकास होतो, हा अण्णांचा दृढनिश्चय होता. आज आपला भारत देश प्रगतिपथावर आहे. विज्ञानाची झपाट्याने वाढ होत आहे, हे कोणाचा द्योतक आहे आणि घडलं कुणामुळे तर हे सारे घडले कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यामुळे हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.