आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांत उस्मानाबाद जिल्ह्यात कृत्रिम पाऊस!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - मराठवाड्यातसर्वाधिक दुष्काळी परिस्थिती असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात वातावरणातील अनुकूलता लक्षात घेऊन येत्या दोन दविसांत कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाईल, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. दऱम्यान, उस्मानाबादसाठी कर्नाटक राज्यातून चारा मागविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या चार वर्षांपासून पावसाने पाठ फिरविल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडत आहे. पावसाअभावी शेतीचे गणित मोडकळीला आले आहे. यावर्षी सगळ्यात भयानक स्थिती उद्भवली आहे.सलग चार वर्षांपासून अपुरा पाऊस होत असल्याने प्रकल्पांमध्ये पाणीसाठा उरलेला नाही. त्यामुळे यावर्षी ऐन पावसाळ्यातच नागरिकांना पाणी-पाणी करत फिरावे लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे शासन स्तरावरून तातडीने हालचाली कराव्यात, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे, राज्याच्या मुख्य सचविांकडे केली होती. सोमवारी यासंदर्भात महसूलमंत्री खडसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली असून, त्यांनी वातावरणाची स्थिती लक्षात घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवू, असे सांगितले. या प्रयोगासाठी उस्मानाबाद विमानतळावर विमान उतरण्याची व्यवस्था अाहे. त्यामुळे शासनाच्या कृत्रिम पावसाच्या या प्रयोगाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात सोमवारी रॉकेटद्वारे करण्यात आलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग फसल्यामुळे विमानाद्वारे पाडण्यात येणारा कृत्रिम पाऊस कितपत यशस्वी होतो याविषयीही जिल्हावासीयांमध्ये तर्क काढले जात आहेत
शेजारचे राज्य भागवणार चाऱ्याची गरज
उस्मानाबादजिल्ह्यात पाणी तसेच चाऱ्याचाही प्रश्न गंभीर असून, जनावरांचे हाल थांबविण्यासाठी चाऱ्याची सोय करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी जिल्ह्याचा टंचाई अहवाल पाठविल्यानंतर पालक सचविांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा कली. त्यानंतर आमदार पाटील यांनी यासंदर्भात महसूलमंत्री खडसे यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी कर्नाटक राज्यातून तसेच पश्चिम महाराष्ट्रातून चारा उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

महसूलमंत्री खडसे स्वत: हजर राहणार
दुष्काळीपरिस्थितीवर मात करण्यासाठी मराठवाड्यात राबविण्यात येत असलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे स्वत: औरंगाबादला जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

मिलिमीटर झाला होता पाऊस
२००३-०४मध्ये झालेल्या प्रयोगानंतर बारामती आणि शेगाव परिसरात मिलिमीटरपर्यंत पाऊस पडला होता. त्यासाठी १२ कोटी रुपये खर्च आला होता. यावेळी बदललेल्या तंत्रज्ञानामुळे पावसाची सरासरी तुलनेने अधिक असेल, असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे.

१० वर्षांपूर्वीचा प्रयोग अयशस्वी
महाराष्ट्रशासनाने २००३-०४ च्या दुष्काळामध्ये राज्यातील बारामती आणि शेगाव परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग केला होता. बारामती परिसरात प्रयोग सुरू असताना काही वेळा उस्मानाबाद परिसरातही कृत्रिम पाऊस पाडणारे विमान आले होते. मात्र, त्यावेळी प्रयोग साफ फसला होता. आता टेक्नॉलॉजीमध्ये काही प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी ठरेल, अशी शक्यता आहे.

दोन दविसांपासून अनुकूल वातावरण
मराठवाड्यातकृत्रिम पावसाचा प्रयोग मंगळवारपासून राबविण्यात येणार आहे. ढगांची अनुकूल स्थिती लक्षात घेऊनच संबंधित भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग राबविण्यात येणार असून,गेल्या दोन दविसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यात कृत्रिम पावसासाठी अनुकूल स्थिती असल्याचे दिसत आहे. मात्र, या ढगांमध्ये पाणी आहे का,या स्थितीत क्लाऊड शेडिंगमुळे पाऊस पडेल का,याची चाचपणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.


बातम्या आणखी आहेत...