आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जनासाठी तयार केला कृत्रिम तलाव, 20 ते 25 हजार आला खर्च

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शेळगी परिसरातील देशाभिमान मित्र मंडळाने गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी होणारी अडचण टाळण्यासाठी स्वतंत्र विसर्जन कुंड तयार करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सिद्धाराम नागशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 
श्री. नागशेट्टी म्हणाले, “या परिसरातील सार्वजनिक मंडळांचे गणपती विसर्जन तेथील एका विहिरीमध्ये करण्यात येत. पण, यंदाच्यावर्षी विहिरीमध्ये घाण पाणी असल्याने मूर्तीचे विसर्जन करणे अशक्य असल्याने स्वतंत्र विसर्जन कुंड तयार करण्याचा निर्णय घेतला. येथील नंदीकेशव नगररातील वडाच्या झाडाखाली २५ फूट रूंद सहा फूट खोलीचा कृत्रिम तलाव तयार केला. मंडळाकडे जमलेल्या वर्गणीतून २० ते २५ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. टँकरद्वारे कुडलसंगम येथील नदीचे पाणी आणून कुंड भरण्यात आला. सोमवारी रात्री नऊ वाजता मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन त्या कुंडामध्ये करून त्याचे उद््घाटन करण्यात येईल, असे ते म्हणाले. 
 
नगरसेवकांचे दुर्लक्ष 
या परिसरातील गणेशोत्सव मंडळाची विसर्जनासाठीच अडचण नगरसेवकांसमोर मांडण्यात आली. पण, त्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केल्यामुळे मंडळाच्या वर्गणीतून कुंड तयार केला, असे नागशेट्टी यांनी सांगितले. 
 
महिलांकडे मंडळाचे नेतृत्व 
यंदाच्या वर्षी मंडळाचे संयोजन महिलांकडे होते. सर्व पदाधिकारी महिला अाहेत. मंडळातर्फे यंदाच्यावर्षी गणेशोत्सवात शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित देखावा करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...